आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियात महाभियोगावर आज नॅशनल असेम्ब्लीत मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क गुन हे यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव गुरुवारी संसदेने दाखल करून घेतला. नॅशनल असेम्ब्लीत शुक्रवारी त्यावर मतदान होणार आहे.

पार्क यांनी घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन केले आहे. देशाला भ्रष्टाचारापासून वाचवण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी अधिकारांचा गैरवापर केला आहे, असे आरोप महाभियोग प्रस्तावात करण्यात आले आहेत. संसदेने शुक्रवारी हा प्रस्ताव मंजूर केला तर तो अंतिम मंजुरीसाठी घटनात्मक न्यायालयाकडे जाईल. न्यायालयाने त्याला मंजुरी दिली तर पार्क यांना पायउतार व्हावे लागेल. अशा स्थितीत पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण न करू शकलेल्या लोकशाही पद्धतीने निवडलेल्या देशाच्या पहिल्या अध्यक्षा अशी त्यांची नोंद होईल.

महाभियोग प्रस्तावाबाबतचा संसदेचा निर्णय आपण स्वीकारू, असे पार्क यांनी सांगितले, पण न्यायालयात त्यावर विचार सुरू असेपर्यंत आपण पदावर कायम राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन प्रक्रियेला अनेक महिने लागू शकतात. अलीकडच्या काही दिवसांत पार्क यांच्याविरोधात निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत.
बातम्या आणखी आहेत...