आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदार्थ खाण्याच्या विचारानेही वाढू शकतो माणसाचा लठ्ठपणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - एखादा पदार्थ समोर दिसला म्हणून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर तुम्हाला सतर्क राहावे लागेल. कारण ही बाब तुमच्या वैचारिक दृष्टिकोनावर अवलंबून असते त्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढण्याचा धोका वाढत जातो. एका संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, लठ्ठपणाचा बहुतांश संबंध हा तुमच्या विचारांशी निगडित असतो. जेव्हा एखादी व्यक्ती कुठली खाण्यापिण्याची वस्तू किंवा पदार्थ बघते तेव्हा तिच्या मनात खाण्याची इच्छा निर्माण होते. पदार्थ खायचा या कल्पनेने तसेच त्याच्या वासाने तोंडाला पाणी सुटते. परंतु या बदलामुळे व्यक्तीच्या शरीराचे वजन वाढायला लागते माणूस मोठा व्हायला लागतो.
अमेरिकेतील कनेक्टिकट प्रांतातील येल विद्यापीठात स्कूल ऑफ मेडिसीन विभागाच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकारचे संशोधने केली. मानसिक कल्पनेची चलबिचल भूक निर्माण करण्यास वाढवण्यास कारणीभूत असते.
संशोधनात असे आढळून आले आहे की, खाण्यापिण्याबाबत जो माणूस जितका जास्त विचार करतो तितके त्याच्या शरीराचे वजनदेखील वेगाने वाढायला लागते. शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की, खाद्यपदार्थांबाबत जितका तीव्र विचार तुम्ही करायला लागाल तितक्याच वेगाने तुमचे वजनही वाढेल.
असा केला अभ्यास
संशोधनातत्यांनी २७ लोकांना त्यांच्या वैचारिकतेबाबत तीन प्रश्न विचारले. पैकी दोन प्रश्न खाद्यपदार्थांशी संबंधित नव्हते. इतर वस्तूंची चित्रे दाखवून त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्या वेळी त्यांच्यात केवळ बौद्धिक पातळीवर हालचाली िदसून आल्या. तिसऱ्या प्रश्नात त्यांना खाण्यापिण्याच्या चीजवस्तूंची िचत्रे दाखवून प्रश्न विचारण्यात आले. ताजे ब्रेड, बिस्किटे, पॉपकॉर्न आदींच्या स्वादामुळे त्यांच्या मेंदूत ते खाण्याचा विचार प्रकट झाला. त्यानंतर त्यांचे वजन शारीरिक लांबी मोजण्यात आली. तेव्हा त्यात बदल झाल्याचे आढळून आले. इतर ५७ लोकांवर असाच प्रयोग करण्यात आला. तेव्हा खाण्याचे प्रश्न ऐकून त्यांचे वजन वाढल्याचे आढळले.