आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Most Expensive Domains Ever Sold On Internet

जगातील सर्वांत महागड्या WEBSITES, काही मिनिटांत लागली अब्जावधींची बोली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या कोणत्याही गोष्टीचे सोल्युशन इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. बस एक क्लिक केले, की अनेक वेबसाईट्सच्या युआरएल ओपन होतात. त्यातील महत्त्वाच्या आपल्याला शोधता येतात. त्यावर आवश्यक माहिती प्राप्त होते. त्याने आपली समस्या अगदी क्षणात दूर होते.
कोणतीही वेबसाईट म्हटली, की डोमेन नेम सर्वात महत्त्वाचे असते. ती त्या वेबसाईटची अप्रत्यक्ष ओळखच असते. सर्च इंजिनवर वेबसाईट सर्च करताना डोमेन नेम अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करीत असते. त्यामुळे हवे ते डोमेन मिळण्यासाठी सर्वांचीच प्रचंड धडपड सुरु असते. यामुळे अब्जावधी रुपयांपर्यंत किंमत गेली असे जगात काही मोजके डोमेन नेम आहेत. आज आम्ही सांगणार आहोत अशा डोमेन नेमबद्दल ज्यांच्यावर काही मिनिटांत अब्जावधी रुपयांची बोली लावली गेली.
360.COM
सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन नेम पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी नुकतीच बोली लावण्यात आली होती.
केव्हा- 2015
किंमत- सुमारे 106 कोटी 25 लाख रुपये
काय असते डोमेन नेम
कोणत्याही वेबसाईटसाठी डोमेन नेम एक ओळख असते. एक चांगले आणि आकर्षक डोमेन नेम युजरला वेबसाईटवर आणत असते. डोमेन नेम सिस्टिममध्ये (डीएनएस) नोंदवण्यात आलेल्या नावाला डोमेन नेम म्हटले जाते. उदा. फेसबुकचे डोमेन नेमfacebook.com आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर वेबसाईटच्या डोमेन नेमबद्दल... यांची विक्री अब्जावधी रुपयांना झाली आहे...