आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इसिसचा कमांडर ‘ओमर द चेचेन’ ठार, अमेरिककडून दुजोरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने ईशान्य सिरियात केलेल्या हल्ल्यात इसिसचा वरिष्ठ कमांडर ‘ओमर द चेचेन’ ठार झाला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ओमर अल-शिशानीच्या ताफ्यावर ४ मार्चला हल्ला करण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पेंटॅगॉनचे प्रवक्ता नौदलाचे कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी दिली. शिशानी वैद्यकीयदृष्ट्या मृत झाल्याची माहिती सिरियातील मानवी हक्क संघटनेच्या अधिकाऱ्याने दिली होती. शिशानी हा अमेरिकेसाठी मोस्ट वाँटेड होता. त्याच्या डोक्यावर ५० लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस होते. अमेरिकेने दहशतवादाच्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे.