आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती असते एका बोईंग 747 जातीच्या विमानाचे वजन, वाचा 10 fACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅरेबियन आयर्लंडमधील साबा येथील व्यावसायिक धावपट्टी सर्वात लहान असून तिची लांबी 400 मीटर आहे. - Divya Marathi
कॅरेबियन आयर्लंडमधील साबा येथील व्यावसायिक धावपट्टी सर्वात लहान असून तिची लांबी 400 मीटर आहे.
इंटरनॅशनल डेस्क- 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्यात येतो. यंदाही तो साजरा करण्यात आला. 7 डिसेंबर 1944 रोजी शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई परिषद झाली होती. 7 डिसेंबर 1996 रोजी या दिवशी आणखी एक महत्त्वाची घटना घडली होती. क्वांटस एअरलाइन्सच्या विमानातील वैमानिक आणि क्रू सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून 449 प्रवाशांचे प्राण वाचवले होते. त्यानंतर लागलीच संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
हवाई सेवांमध्ये सुधारणा, संरक्षण, मार्गांची निश्चिती, परिवहन आदी व्यवस्थेत आणखी सुधारणा करणे, हा या दिवसाचा उद्देश होता. त्यामुळे जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी, व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी)साठीदेखील हा दिवस महत्त्वाचा असतो. 27 हजार विमाने उडाली 2015 सालात...
- 3.5 अब्ज प्रवाशांनी 2015 मध्ये हवाई मार्गाने प्रवास केला.
- 27 हजार प्रवाशांनी 2015 मध्ये नियमित विमानाने उड्डाण केले.
- 67 आफ्रिकन हत्तींच्या वजनाएवढे बोइंग 747 विमानाचे वजन असते. त्याला जंबो जेट असेही म्हणतात.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, जागतिक नागरी हवाई क्षेत्राबाबत नाविन्यपूर्ण गोष्टी....
बातम्या आणखी आहेत...