आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक देशातील जेलमधील क्रूर दृश्य, राष्ट्राध्यक्षांनी बंडखोरांना केले क्रूरपणे ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियाचे राष्ट्रपती बशर-अल असद यांनी सुमारे १३ हजार विरोधकांना सरकारी कारागृहात गुप्तपणे फाशी दिली आहे. - Divya Marathi
सीरियाचे राष्ट्रपती बशर-अल असद यांनी सुमारे १३ हजार विरोधकांना सरकारी कारागृहात गुप्तपणे फाशी दिली आहे.
इंटरनॅशनल डेस्क- सीरियाचे राष्ट्रपती बशर-अल असद यांनी सुमारे १३ हजार विरोधकांना सरकारी कारागृहात गुप्तपणे फाशी दिली आहे. दर आठवड्याला ५० लोकांना; अशा पद्धतीने ही सामूहिक फाशी देण्यात येत होती; असा धक्कादायक खुलासा ‘एमनेस्टी इंटरनॅशनल’च्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. चार वर्षात केले हे कृत्य....
 
- सन २०११ ते १५ दरम्यान दमिश्कजवळील सैदनाया लष्करी कारागृहात या सामूहिक फाशी देण्यात आल्या आहेत. 
- न्यायालय, वकील किंवा कोणतीही चौकशी न करताना त्यांच्यावर अत्याचार करून गुन्हा कबूल करून घेऊन त्यांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात येत होती. 
- या सामूहिक फाशीबाबत सुरक्षारक्षक, कैदी आणि न्यायाधिशांसह ८४ प्रत्यक्षदर्शिनी माहिती दिल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
- अजूनही या कारागृहात मृत्यूचा खेळ सुरू आहे. आठवड्यातून दोन दिवस – सोमवार आणि बुधवारी ज्यांची नावे पुकारण्यात येतात.
- त्यांना सांगितले जाते की तुम्हाला दुसर्‍या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना कारागृहातील तळगृहात घेऊन दोन-तीन तास मारहाण करण्यात येते. 
 
जेलच्या तळगृहात दिली जाते सामूहिक फाशी-
 
- कैद्यांना दुसर्‍या इमारतीतील तळगृहात त्यांना सामूहिक फाशी देण्यात येते. 
- या संपूर्ण कारवाई दरम्यान कैद्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते. 
- फाशी देण्यापूर्वी फक्त एक मिनीट त्यांना फाशी देण्यात येत असल्याचे सांगितले जाते. 
- फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह गुप्तपणे दफन करण्यात येत. याबाबत त्यांच्या कुटुंबियांनीही माहिती दिली जात नसे.
- ही भयानक परिस्थिती सांगणार्‍या पीडितांच्या साक्षीने लंडनच्या एनजीओने चौकशी केली असता सीरियाच्या सैदनाला कारागृहात पाच वर्षांत सुमारे १३ हजार नागरिकांनी फाशी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, जेलमध्ये सडलेले मृतदेहाचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...