आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचे मच्छरच पसरवतात ब्राझीलला हादरवणाऱ्या Zika Virusचा संसर्ग, जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिका या घातक व्हायरसच्या संसर्गामुळे ब्राझीलमध्ये सध्या जणूकाही आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. या व्हायरसचा गर्भवती मातेला संसर्ग झाल्याने नवजात शिशुंवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. व्हायरसमुळे नवजात बालकांच्या डोक्याचा आणि मेंदूचा पूर्णपणे विकास होत नसल्याचे दिसून येत आहे.

झिकाच्या संसर्गामुळे ब्राझीलमधील अनेक कुटुंबांमध्ये नवीन बाळाच्या जन्मानंतर आनंदोत्सवाऐवजी काहीसे दुःखाचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांतच मायक्रोसेफलीच्या सुमारे 1000 पेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. सरकार, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रशासन सगळेच या व्हायरसमुळे हतबल झाल्याचे दिसत आहे.

ब्राझीलमध्ये असलेले हवामान, दाट लोकवस्तीची शहरे, दारीद्र्य आणि नियोजन नसलेली शहरे यामुळे ब्राझीलमध्ये आणि अमेरिकेतील इतर शहरांत झिकाच्या वाहक मच्छरांना पोषक वातावरण मिळत असल्याचे समोर आले आहे. विविध आरोग्य संस्था आणि सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर गर्भवती महिला मच्छरांपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी विविध देश संस्था प्रयत्न करत आहेत.

झिकाचा सामना करण्यासाठी ब्राझीलमध्ये हजारो सरकारी कर्मचारी कामाला लागले आहेत. एवढेच काय तर ब्राझीलची आर्मीदेखिल या कामात मदत करत आहे. स्वच्छतेपासून ते विविध उपाययोजनांबाबत लोकांना माहिती दिली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, झिकाविषयी सर्वकाही...