अदिस अबाब (इथियोपिया)- येथील हरार या मोठ्या गावात हायना आणि मनुष्यांची मैत्री पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. 19 व्या शतकापासून हायनाला खाद्य देण्याची या गावात परंपरा आहे. त्यांना जेवण दिल्यास ते पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत नाहीत, असे येथील ग्रामिण नागरिक सांगतात. आता येथील हायनालाही याची सवय झाली आहे. तेही पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत नाहीत. लोकांनी दिलेले मांसाचे तुकडे खातात. एवढेच नव्हे तर या गावातील बालकेही हायनांना भरविण्याच्या कामात पुढाकार घेतात.
काही ग्रामस्थ सांगतात, की धार्मिक परंपरे अंतर्गत हायनाला मांस भरवले जाते. त्याने वार्षिक हवामानाची माहिती मिळते. देवी-देवताही खुष राहतात.
पुढील स्लाईडवर बघा, या गावात मांस खाण्यासाठी कसे येतात हायना....