आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडालेल्या जहाजामधून सापडला खजिना, चांदीची ब्रिटिशकालीन १०० टन नाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - सुमारे ७० वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या जहाजातून सुमारे १०० टन चांदीची ब्रिटिशकालीन नाणी बाहेर काढण्यात एका कंपनीला यश आले आहे. या नाण्यांची आजची किंमत सुमारे ३१५ कोटी रुपये आहे.

दुसरे महायुद्ध तेव्हा पेटलेले होते. सन १९४२ चा तो काळ. भारतातून एक जहाज चांदीची सुमारे १०० टन नाणी घेऊन इंग्लंडच्या दिशेने निघाले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी ही नाणी
चलनात होती. मुंबईहून निघालेले हे जहाज द. आफ्रिका व ब्राझीलमार्गे लंडनला पोहोचणार होते; परंतु ते समुद्रात बुडाले.
जर्मनीच्या पाणबुडीचे लक्ष्य
"एसएस सिटी ऑफ कैरो' नावाचे हे प्रवासी व मालवाहतूक करणारे मोठे जहाज होते. ६ नोव्हेंबर १९४२ रोजी ते सेंट हेलेनानजीक असताना जर्मनीच्या यू-६८ या पाणबुडीने हल्ला केल्यानंतर जहाजाचे दोन तुकडे झाले. जहाज बुडाले तेव्हा या जहाजावर २९६ प्रवासी होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
लोक विसरूनही गेले...
टनावर चांदीची नाणी घेऊन जाणारे एक जहाज बुडाल्याच्या बातम्या जेव्हा पसरल्या तेव्हा जगभर लोकांना दु:ख आणि उत्सुकता होती. मात्र, कालांतराने लोक या जहाजाविषयी विसरून गेले. यादरम्यान "डीप ओशन सर्च' नावाच्या एका कंपनीने सुमारे ७० वर्षांनी हा खजिना शोधून काढला.
ब्रिटनशी करार
एसएस-सिटी जहाज समुद्रतळाशी जाऊन शोधण्यासाठी ओशन सर्चने ब्रिटिश सरकारशी विशेष करार केला होता. अखेर चांदीचा हा खजिना सापडला. तो ब्रिटनच्याच तिजोरीत जमा होईल.