आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या या कार्यालयात आहेत ट्री हाऊस, सन टेरेस, रेस्तराँ, डक पाँड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेक्सहॅम- ब्रिटनमधील प्रसिद्ध लीगल आऊटसोर्सिंग टेलिफोन आन्सरिंग स्पेशालिस्ट कंपनी मनिपेनीचे हे मुख्यालय आहे. या कार्यालयाचे उद््घाटन सोमवारी झाले. ९१ हजार चौरस फुटांत पसरलेल्या या कार्यालयातील बैठक खोली एका ट्री हाऊसमध्ये आहे. ग्रामीण भागातील वातावरणाचा अनुभव देणारे ग्राम पब, सन टेरेस, स्टेडियम सीटिंगसारखे अंगण तसेच मोफत फळे तसेच नाष्टा देणारे रेस्तराँ ही या कार्यालयाची वैशिष्ट्ये आहेत.

यावर सुमारे १५ दशलक्ष पाउंड (सुमारे १३३.२८ कोटी रुपये) खर्च झाले आहेत. कंपनीत एकूण ५०० कर्मचारी काम करतात. जे देशातील प्रमुख लीगल संस्था तसेच सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आमचे ग्राहक चांगली प्रतिभा असणाऱ्या लोकांची सेवा हवी असल्याची मागणी करत असल्याने आम्हाला प्रोफेशनल, सकारात्मक तसेच तज्ज्ञ सहकाऱ्यांची आवश्यकता असते. त्यांना असे बनवण्यासाठी कार्यालयाचे वातावरणही तसेच असायला हवे. आमचे कर्मचारी खुश असतील तर आमचे ग्राहकदेखील खुश असतील, असे मनिपेनीचे संचालक आणि सहसंस्थापक एड रिव्हस यांनी सांगितले.

दरवर्षी कोटी कॉल्स
वर्ष २००० मध्ये सुरू झालेली ही कंपनी इंग्लंडमधील सुप्रसिद्ध संस्था बनली आहे. कंपनी वर्षभरात सुमारे एक कोटी कॉल्सना उत्तर देते. बिझनेस छोटा असो वा मोठा सर्वांना मदत करते. न्यूझीलंड, अमेरिकेतही कंपनीच्या शाखा आहेत. रेक्सहॅममध्ये ही नवी मुख्यालयाची इमारत मँचेस्टरची आर्किटेक्ट संस्था एईडब्ल्यूने बनवली आहे. ही इमारत ब्रिटनमधील सर्वात आनंददायी ठरली पाहिजे, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असल्याचे एड रिव्हस सांगतात.

पुढील स्लाइडवर वाचा, उभारण्यासाठी खर्च झाले १३३ कोटी रुपये

बातम्या आणखी आहेत...