आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GROUND REPORT : मदतीबाबतचे असे सत्य जे समोर आलेच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमंडूमध्ये रविवारी सकाळी दरबार स्क्वेअर वर कबुतरांना खाद्य देणारी एक महिला. - Divya Marathi
काठमंडूमध्ये रविवारी सकाळी दरबार स्क्वेअर वर कबुतरांना खाद्य देणारी एक महिला.
काठमंडूहून लक्ष्मी प्रसाद पंत
237 पर्यटक विरुद्ध दहा लाख जीव
आता जाणून घ्या नेपाळच्या भूकंपानंतरचे असे सत्य जे अद्याप समोर आलेच नाही. काठमंडूत वाचवलेल्या लोकांना पाहून नेपाळमध्ये भूकंपानंतर आता सर्व ठीक होत आहे, असे समजू नका. टिव्हीवर संकटातून वाचवलेल्या 11,000 लोकांबाबत वारंवार दाखवले जात आहे. हेलिकॉप्टर आणि विमानांतून खाद्यसामुग्रीची पाकिटे फेकल्याचे तुम्ही पाहू शकता. हे सर्व खरे असले तरी सत्याची दुसरी बाजूही असते. ती जाणून घेणेही गरजेचे असते. जेव्ही ही बाजू समोर येईल तेव्हा अनेकांचे खरेच चेहरेही समोर येतील.

पहिले सत्य - दोन दिवसांनी पोहोचली सरकारी मदत
नेपालमध्ये भूकंपानंतर दोन दिवसांनी सरकारी मदतकार्य सुरू झाले. मग दोन दिवस सरकारी फौज फाटा कुठे होता? मदत कार्यातही गरीब आणि व्हिआयपी अशा भेदभाव होतो, याचा विचारही आपण करू शकणार नाही. पण नेपाळमध्ये तेच झाले. शनिवारी भूकंपआल्यानंतर सरकारी फौजफाटा, हेलिकॉप्टर आणि लवाजमा लष्करासह एव्हेरवर चढाई करण्यासाठी आलेल्या 22 देशांच्या 237 गिर्यारोहकांना शोधण्यासाठी रवाना झाले. सगळे नोकरशहादेखिल या देशांच्या दुतावासांना उत्तर देण्यात व्यस्त होते. दुसरीकडे नेपाळच्या 14 भूकंपग्रस्त जिल्ह्यांतील एक तृतीयांश लोकसंख्या म्हणजे सुमारे दहा लाख लोक मदतीच्या आशेवर होते. भूकंप शनिवारी आला. त्यादिवशी नेपाळमध्ये साप्ताहिक सुटी अशते. काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी किंवा उच्च अधिकारीही सुटीवर होते. दोन प्रमुख अधिकारी तर गृहमंत्री वामदेव गौतम यांच्या आव्हानानंतरही दोन दिवसांनी परतले. एवढेच काय, पण नेपाळचे पंतप्रधान सुशीलकुमार कोयराला यांना भूकंपाची माहिती नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटवरून मिळाली होती. संपूर्ण बचाव मोहीमेची जबाबदारी गृहमंत्री वामदेव गौतम यांच्या खांद्यावर होती. पण त्यांना ती सांभाळता आली नाही. त्यांचा बराच वेळ तर 14 भूकंपग्रस्त जिल्ह्यांच्या अधिका-यांचे क्रमांक मिळवण्यातच गेला. विशेष म्हणजे सर्वाधिक हानी झालेल्या 11 जिल्ह्यांत सॅटेलाईट फोन होते, पण अधिका-यांना त्यांचा नीट वापरच करता येत नव्हता. संकटकाळात सर्वात गरजेची असते ती दूरसंचार यंत्रणा. पण त्यातही अपयश आले. नेपाळचे माहिती मंत्री मानेंद्र रिजाल यांनी एवढ्या मोठ्या संकटासाठी तयार नसल्याचे कबूल केले.

दुसरे सत्य - काठमंडूच्या बाहेर ग्रामीण भागांपर्यंत मदत पोहोचलीच नाही
भूकंपाच्या सुमारे आठवडाभरानंतर अझूनही काठमंडू हेच मदतकार्याचे केंद्र आहे. पण सर्वाधिक नुकसान हे सिंधु पाल चौक, गोरखा, दोलखा, नवांकोट, रसुआ, भक्तपूर, हिमालयचा परिसर, चारीकोट, ललितपूर, घादिंग, काव्यपंचाग यासह चौदा जिल्ह्यांत आहे. दुर्दैवी बाब म्हणजे बिगरसरकारी आकडेवारीचा विचार करता नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण 11,000 जणांनी जीव गमावला आहे. त्यापैकी 7000 याच जिल्ह्यांतील आहेत. ही गावे अगदीच दुर्गम आहेत, असेही नाही, सर्व काठमंडूच्या 60 किमीच्या परिघातील आहेत. पण बेजबाबदारपणामुळे अद्याप या ठिकाणी मदत छावण्याही उभारण्यात आलेल्या नाहीत. आकाशातून साहित्य टाकले जात आहे. पण ते कोणाला मिळते, कोणाला नाही. वितरणचाही काहीही व्यवस्था नाही. काही ठिकाणी खाद्यपदार्थांची पाकिटे, बिस्किट, औषधे यांचे ढीग लागले आहेत. अनेक ठिकाणी लोक साहित्याची गाडी येताच लोक अक्षरशः लुटालूट करतात. या भूकंपात संपूर्ण गाव उध्वस्त झालेले नेपाळी काँग्रेसचे प्रमुख नेते नवीन जोशी यांच्या मते मदतकार्य हे देवाच्या भरवशावर आहेत. लोक वेगवेगळ्या देशांमधून विमानात बसून येतात आणि काठमंडूचेच सर्वाधिक नुकसान झाले असे समजून मदत देऊन परत जातात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, तिसरे सत्य - भूकंपाच्या एपिक सेंटवरमध्ये सगळे मृत असल्याचे समजत आहे सरकार