बिश्केक - किर्गीझस्तानमध्ये सध्या पारंपरिक आदिवासी महोत्सवाला सुरुवात झाली अाहे. त्यात पारंपरिक तिरंदाजीच्या खेळात एका निष्णात महिलेने काही अंतरावरील लक्ष्य अचूकपणे टिपले. पायांच्या साह्याने तिने संतुलन राखत लीलया केलेली कसरत पाहणाऱ्यास चकित करणार नसेल तरच नवल. या महोत्सवात महिला झोक्याचाही आनंद लुटतात. त्यात महिला-पुरुष सहभागी होतात.