आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाला घेरण्यासाठी ट्रम्प करणार जपान, द. कोरियासह चार देशांचा दौरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ११ दिवसांच्या आशिया दौऱ्याला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ते जपान, दक्षिण कोरिया, चीन, फिलिपाइन्स आणि व्हिएतनामचा दौरा करणार आहेत. ट्रम्प यांच्या कार्यक्रम पत्रिकेत उत्तर कोरियाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी कूटनीती व रणनीतीसाठी वातावरण तयार करण्यास प्राधान्य आहे.
 
ट्रम्प सर्वात अगोदर हवाई येथून जपानला पोहोचतील. जुन्या मित्रांसोबतचे संबंध बळकट करणे आणि भारतीय उपखंड-प्रशांत प्रदेशातील नवीन संबंध प्रस्थापित करणे, असा या दौऱ्यामागील उद्देश आहे, असे ट्रम्प यांचे राष्ट्रीय सल्लागार लेफ्टनंट जनरल एच.आर. मॅकमास्टर यांंनी सांगितले.
२६ वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षांचा प्रदीर्घ दौरा : अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांनी प्रदीर्घ दौरा करण्याची ही सुमारे २६ वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे. १९९१ मध्ये जॉर्ज बुश यांनी दौरा केला होता.
 
म्यानमारच्या सैन्य अधिकाऱ्यांवर निर्बंधाचा सिनेटर्सचा प्रस्ताव
मायदेश सोडून बांगलादेशमध्ये पलायन करणाऱ्या रोहिंग्यांवरील अत्याचारास जबाबदार असल्याप्रकरणी म्यानमारच्या काही लष्करी अधिकाऱ्यांवर निर्बंध लावण्याचे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये मांडण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात मानवी हक्कविषयक मूल्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  जॉन मॅकेन, बेन कार्डिन, डिक डर्बिन, मार्को रुबिआे, टॉड याँग यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या विरोधात निर्बंधाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर एड मर्के, जेफ मर्केल, डीएन फिन्स्टीन, ब्रायन शात्झ, टीम केनआदींनी  स्वाक्षरी केली. 
 
दौऱ्याचा अमेरिका व इतर देशांच्या दृष्टीने अन्वयार्थ
 
अमेरिका : जगात महाशक्ती म्हणून कायम राहण्यासाठी अमेरिका आशियात आपली शक्ती बळकट करू इच्छिते. तो उत्तर कोरियाच्या आडून जगाला आपल्या शक्तीचा अनुभव देऊ इच्छितो. त्यात जपानची सोबत मिळावी, असे त्याला वाटते.
 
 
जपान : ट्रम्प यांच्याप्रमाणेच अॅबेदेखील उत्तर कोरियाच्या अाण्विक चाचणी व अणुहल्ल्याच्या धमकीवर झीरो टॉलरन्स भूमिकेवर ठाम आहेत.
- खबरदारी म्हणून जपानने होक्काइडोमध्ये सप्टेंबरमध्ये दोन क्षेपणास्त्रे तैनात केलेली आहेत.
- अॅबे उत्तर कोरियाला धडा शिकवण्याच्या अजेंड्यावरच निवडणुकीत विजयी झाले आहेत.
- जपानला चीनकडून त्रास आहे. सीमा जोडलेल्या असल्याने उत्तर कोरिया ९० टक्के व्यापार चीनसोबत होतो. जोपर्यंत ठोस पाऊल उचलले जात नाही तोपर्यंत जपान त्याच्या चर्चा व्यर्थ मानतो.
 
 
अॅबे यांच्यासोबत गोल्फ कूटनीती
ट्रम्प जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यासोबतची वैयक्तिक मैत्री वाढवण्यासाठी गोल्फ कूटनीतीचा वापर करतील. रविवारी दुपारी ट्रम्प व अॅबे हिडेकी मत्सुयामा यांच्यासोबत गोल्फ खेळतील. ६० वर्षांपूर्वी जून १९५७ मध्ये अॅबे यांचे वडील तत्कालीन पंतप्रधान नाेबुसुके यांनीही कार्सेमध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आइत्झ्नॉहर यांच्यासोबत गोल्फ खेळले होते.
 
 
दहा महिन्यांत भारतासह अन्य देशांशी ४३ वेळा संभाषण
मॅकमास्टर म्हणाले, गेल्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा धोक्याबाबत भारतीय उपखंड तथा आशियातील नेत्यांशी ट्रम्प यांनी ४३ वेळा संभाषण केले आहे. त्यांनी जपान, दक्षिण कोरिया, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंडच्या नेत्यांशी द्विपक्षीय बैठकीही घेतल्या.
 
बातम्या आणखी आहेत...