आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Troops And Cadets Marched In Formation As They Prepared For One Of The Most Sacred Days In Russian Calendar

रशियाची आर्मी परेड, जगाला दाखवले सर्वात मोठे न्यूक्लियर मिसाईल वेपन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे न्यूक्लियर मिसाईल वेपन RS 28-SARMAT - Divya Marathi
रशियाचे न्यूक्लियर मिसाईल वेपन RS 28-SARMAT
इंटरनॅशनल डेस्क- रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये नुकतीच मिलिट्री परेड काढण्यात आली. 9 मे रोजी रशियात आयोजित केल्या जाणा-या ‘विक्ट्री डे’ ची ती रिहर्सल होती. ही रिहर्सल खरं तर नॉर्मलच असते पण यंदाच्या रिहर्सलने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. कारण परेडमध्ये टॅंकशिवाय न्यूक्लियर मिसाईलही नजरेस पडली. ज्याचे फोटोज रशियन मीडियाने सादर केले आहेत तसेच जगातील सर्वात मोठे न्यूक्लियर वेपन असल्याचे सांगितले. 10 हजार किमीची रेंज...
 
- रशियन मीडियाच्या माहितीनुसार, रशियाच्या या नव्या मिसाईल वेपनला अमेरिकेसह 28 देशांची संघटना असलेली NATO सुदधा हादरली. यूएस व नाटोने याला SATAN म्हणजेच शैतान हे नाव दिले आहे.
- रशियाने मात्र याला RS 28-SARMAT नाव दिले आहे. हे वेपन प्रति सेकंद 7 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकते.
- रिपोर्ट्सनुसार, या वेपनची विध्वंसक क्षमता इतकी आहे की, नागासाकी आणि हिरोशिमावर जे अणुबॉम्ब टाकले गेले ते याच्या आसपासही नाहीत.
- 7 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने हल्ला करणारे हे न्यूक्लियर मिसाईल 10 हजार किलोमीटर दूर अंतरावर हल्ला करू शकते.
- या वेगाने हल्ला करू शकणा-या मिसाईलपुढे अमेरिकेचे सर्वात आधुनिक एंटी मिसाइल सिस्टिम सुद्धा काही त्याचे वाकडे करू शकणार नाही. 
 
रशियाचे शक्ती प्रदर्शन?
 
- खरं तर दरवर्षी ही रिहर्सल परेड सामान्य होते, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे.
- पश्चिमी मीडिया याला थेट रशियाचे शक्ती प्रदर्शन मानू लागली आहे. कारण नुकतेच अमेरिकेने सीरियावर मिसाईल अॅटक केल्यानंतर रशिया आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाला होता.  
- गुरुवारी अमेरिकी एयरफोर्सने लांब पल्ल्याची एक मिसाईल टेस्ट यशस्वी केली. ते न्यूक्लियर वेपन्स घेऊन जाण्यास सक्षम आहे. 
 
का मानला जातो रशियात ‘विक्ट्री डे’-
 
- 8 मे 1945 रोजी रशियाच्या सेनेपुढे जर्मनीच्या नाजी फौजांनी गुडघे टेकले होते. यासोबतच यूरोपसाठी दुसरे महायुद्ध संपले होते.
- या विजयानिमित्त 9 मे रोजी मॉस्कोत रेड स्क्वेयरवर विजय दिवस साजरा केला जातो. यात रशियन सेना आपली ताकद दाखवते.
- विक्ट्री डे' रशियासाठी महत्वपूर्ण कार्यक्रम असतो कारण याद्वारे तेथील सामान्य लोकांत देशप्रेमाची भावना निर्माण होते.
- याच दिवशी दुस-या महायुद्धात मारल्या गेलेल्या सुमारे 2 कोटी रशियन नागरिकांना श्रद्धांजली वाहिली जाती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेंट पीटर्सबर्गमध्ये आयोजित आर्मी परेडचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...