आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्‍प इमिग्रेशन धोरणावर मवाळ, संयुक्त सत्रात भूमिकेत बदल; भारतीयाच्या हत्येचा निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या इमिग्रेशन धोरणात बदल करण्याचे संकेत दिले. तस्कर, गुन्हेगारांना अमेरिकेत प्रवेश बंद राहिल. मात्र बुद्धीमान आणि गुणवंतांसाठी तसेच उदरनिर्वाह करण्यास सक्षम लोकांना देशात प्रवेश दिला जाईल असे ट्रम्प म्हणाले. काहीं दिवसांपूर्वी कन्सास येथे झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येचा त्यांनी निषेध केला. मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या संयुक्त सत्राला प्रथमच संबोधित केले.
 
इमिग्रेशन, निर्वासित, इसिसचा आणि मेक्सिको सीमेवर उभारण्यात येणाऱ्या भिंती विषयी त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. गुणवत्तेच्या आधारे आम्ही इमिग्रेशन धोरण राबवू असे ते म्हणाले. यात भेदभावाला जागा नसेल. नव्या धोरणात अकुशल लोकांना प्रवेश बंदी केली जाईल. आम्ही बेरोजगारी निर्मूलन करू. वेतन वाढीकडे सरकारचा कटाक्ष राहील. शिवाय अकुशल लोकांना प्रवेश न दिल्याने अब्जावधी डॉलर्सची बचत होईल. यामुळे अमेरिकन लोक अधिक सुरक्षित होतील.
 
श्रीनिवासन यांचा नामोल्लेख न करता कन्सास हल्ल्याचा निषेध
नुकतीच ज्यू स्मशानभूमीत तोडफोड झाली. कन्सास मध्ये अभियंत्याची हत्या झाली. याचा मी निषेध करतो असे ट्रम्प म्हणाले. हा वर्णद्वेषी गुन्हा होता. राजकीय स्तरावर आपल्यामध्ये मत भिन्नता आहे . मात्र अशा घटनांना देशात थारा दिला जाणार नाही असे आश्वासन ट्रम्प यांनी दिले.
 
भारतवंशीय संसद सदस्य ट्रम्प यांच्या भाषणावर नाराज : प्रमिला जयपालसह चार भारतवंशीय संसद सदस्यांनी ट्रम्प यांच्या भाषणाला अवास्तव म्हटले आहे. त्यांनी आेबामा केअर विषयी चूकीची माहिती दिल्याचे यात म्हटले आहे. अमानवी इमिग्रेशन धोरणाचे त्यांनी समर्थन केल्याबद्दल प्रमिला यांनी निषेध व्यक्त केला. बेरा, कमला हॅरीस यांनी देखील ट्रम्पचे भाषण विरोधाभासी असल्याचे म्हटले. गरीबी दूर करण्याची हमी देत त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक कमी केल्याबद्दल भारतवंशीय लोकप्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला. जगभरातून या धोरणाचा निषेध होत होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...