आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7000 भारतीयांसह 8 लाख लोकांना बाहेर काढणार US, ट्रम्प यांनी पलटला ओबामांचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत निदर्शने... - Divya Marathi
अमेरिकेत निदर्शने...
वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामांचा आणखी एक निर्णय पलटला आहे. त्यामुळे, 7 हजार भारतीयांसह 8 लाख लोकांना अमेरिकेतून बाहेर काढले जाणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ओबामांनी अमेरिकेत लहानपणी अवैधरीत्या आणलेल्या अनिवासींना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. तोच निर्णय ट्रम्प यांनी रद्द केला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध व्हाईट हाऊसच्या बाहेर आणि अमेरिकेत सर्वत्र निदर्शने केली जात आहेत.
 
 
- व्हाइट हाउसच्या बाहेर शेकडो लोक निदर्शने करत आहेत. डीएसीए प्रोग्राम ओबामा प्रशासनाने 2012 मध्ये लागू केला होता. 
- तो रद्द करत असल्याची घोषणा करून अमेरिकेचे एटॉर्नी जनरल जेस सेशन्स म्हणाले, "डीएसीए घटनाबाह्य होते. त्याने हजारों अमेरिकन नागरिकांच्या संधी हिसकावून बाहेरच्यांना दिल्या आहेत. आपल्याच मर्जीने देशात घुसणाऱ्यांना आम्ही येथे ठेवू शकत नाही."
 
 
ओबामांनी केला तीव्र निषेध
- अमेरिकेत वाढलेल्या आणि संघर्ष करणाऱ्यांवर अशा प्रकारचे निर्णय घेणे हे अतिशय चुकीचे आहे. कारण, त्यांनी काहीही वाईट केलेले नाही. 
- इमिग्रेशन अतिशय नाजूक विषय आहे. हा मुद्दा नेहमीच अंतर्गत सुरक्षा, सीमा सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेसह स्थानिकांशी जोडून पाहिला जातो. त्यामुळे, प्रत्येक जण आप-आपल्या परीने आणि आप-आपल्या नियमाने या विषयाकडे पाहतात. 
- मात्र, इमिग्रेशन संदर्भात अमेरिकेने आज घेतलेला निर्णय येथे वाढलेल्या आणि शिकत असलेल्या लाखो लोकांवर अन्याय आहे.
 
 
आत्ताच कुणालाही काढणार नाही
- या निर्णयाची अंमलबजावणी लगेच होणार नाही. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तो टप्प्या-टप्प्याने लागू होणार आहे. विशेष म्हणजे, या निर्णयानंतर बेकायदा इमिग्रंट्स पुन्हा दिलासा मिळवण्यासाठी आवेदन देऊ शकणार नाही. 
- आधीच दिलासा मिळालेल्यांची सवलत कायम राहणार आहे. परमिट समाप्त होत नाही, तोपर्यंत ते काम करू शकतील. मात्र, त्यांना मिळालेले संरक्षण पुढच्या वर्षी 5 मार्च पूर्वी संपुष्टात येत असेल तर ते शेवटच्या वेळेस रिन्यू फॉर्म दाखल करू शकतात. मात्र, त्यांची मुदत 6 मार्च रोजी संपुष्टात येत असेल तर ते रिन्यू करू शकणार नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...