आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात धार्मिक स्वातंत्र्यावर गदा, ट्रम्प सरकारच्‍या मानवी हक्क अहवालात भारतावर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेने भारतात धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध असल्याचा दावा केला आहे. ही भारताची प्रमुख मानवी हक्क विषयक समस्या आहे, असे परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. सहा राज्यांत धर्मांतरावर प्रतिबंध आहेत. या आरोपाखाली काही लोकांना अटकही झाली आहे. परंतु ते दोषी ठरले नाहीत.
 
ट्रम्प प्रशासनाने पहिल्यांदा ‘द स्टेट डिपार्टमेंट २०१६ कन्ट्री रिपोर्ट्स ऑन ह्यूमन राइट्स प्रॅॅक्टिसेस ’ मध्ये २०१६ च्या मानवी हक्क विषयक समस्यांचा पाढा वाचला. शुक्रवारी जाहीर अहवालात एनजीआेच्या परदेशी फंडिंग बंद करण्याचाही उल्लेख आहे. भारतातील सरकारने एनजीआेला मिळणाऱ्या परदेशी निधीवर निर्बंध आणले आहेत. 

त्यामुळे सामाजिक कार्य ठप्प झाले आहे. त्यात अनेक संस्था चांगले काम करत असतानाही त्यांना सरकार देशहिताच्या दृष्टीने बघितले जात नाही. त्यांचे काम जनहिताचे नाही, असे भारत सरकारला वाटते.

न्यायदानात विलंब, हत्यांचाही उल्लेख
लोक गायब होणे, तुरुंगांची वाईट स्थिती आणि न्यायालयात असंख्य प्रलंबित समस्यांचाही उल्लेख अमेरिकेच्या अहवालात करण्यात आला आहे. पोलिस, सुरक्षा दलाकडून नागरिकांच्या हत्या, त्यांचा छळ व अत्याचाराच्या काही समस्याही आहेत. व्यापक स्वरूपात पसरलेल्या भ्रष्टाचाराचाही त्यात उल्लेख आहेे.

फुटीरवाद्यांनी केल्या हत्या : जम्मू -काश्मीर, पूर्वोत्तर-नक्षलग्रस्त भागात फुटीरवादी व दहशतवाद्यांनी अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. दहशतवाद्यांनी सैनिक, पोलिस कर्मचारी, सरकारी अधिकारी, सामान्य नागरिकांच्याही हत्या घडवून आणल्या आहेत.

निवडणूक मोहिमेदरम्यान माझा फोन टॅप केला; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आेबामा यांच्यावर आरोप
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. गेल्या वर्षीच्या निवडणूक प्रचारादरम्यान आेबामा यांनी ही कृती केली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ऑक्टोबरमध्ये आेबामा यांनी माझा फोन टॅप केला होता, असे ट्रम्प यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. तेव्हा आेबामा यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष पद होते. राष्ट्राध्यक्ष पदावरील व्यक्ती एवढ्या खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो, हेच मला कळत नाही, असे ट्रम्प यांनी ट्विटरवरून नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...