आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना US मध्ये प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय घेणार मागे -ट्रम्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रम्प यांनी ट्रॅव्हल बॅन प्रकरणात माघार घेतली आहे. तसेच मुस्लिम नागरिकांवर बंदी घालण्याऐवजी देशातील सुरक्षा व्यवस्था व यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर भर देणार असल्याचे म्हटले आहे. - Divya Marathi
ट्रम्प यांनी ट्रॅव्हल बॅन प्रकरणात माघार घेतली आहे. तसेच मुस्लिम नागरिकांवर बंदी घालण्याऐवजी देशातील सुरक्षा व्यवस्था व यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर भर देणार असल्याचे म्हटले आहे.
वॉशिंग्टन- डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कोर्टात दाखल झालेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रॅव्हल बॅनच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कोणत्याही मोठ्या समितीची गरज नाही. आम्ही लवकरच ही बंदी हटवू. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्पष्टीकरण दिले की, मुस्लिम देशातील नागरिकांवर सरसकट बंदी घालण्याच्या निर्णयाऐवजी आम्ही दुसरा निर्णय घेऊ व लवकरच तो अमलात आणू. ट्रॅव्हल बॅनच्या विरोधात वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, मिनेसोटासह 20 राज्ये एकत्र आली आहेत. 27 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी 7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती. या निर्णयाबाबत अमेरिकेसह जगभरात विरोध होत होता. ट्रम्प यांचा आता सुरक्षा यंत्रणेवर राहणार भर...
 
- ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, " राष्ट्राध्यक्ष यांना कोणत्याही देशाविरूद्ध, धर्माविरूद्ध आकस नाही, तर देशाची सुरक्षा यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले होते. देशाची सुरक्षा त्यांना महत्त्वाची वाटते. मात्र, या निर्णयामुळे कायदेशीर अडचणी तयार झाल्या आहेत. ट्रम्प यांना यात अजिबात अडकायचे नाही. "
- आपल्याला माहित असेलच की, मागील आठवड्यात 3 न्यायाधिशांच्या एका खंडपीठाने खालच्या कोर्टाचा (लोअर कोर्ट) एक निर्णय रद्द करण्यास नकार दिला होता. तर या कोर्टाने ट्रॅव्हल बॅनचा निर्णय थेट निलंबित करण्याबाबत भाष्य केले होते. 
- 3 न्यायाधिशाच्या खंडपीठाने ट्रम्प प्रशासनाच्या प्रेसिडेंशियल अथॉरिटी आणि त्यांच्या उद्देशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 
- मात्र, ट्रम्प प्रशासनाने सारवासारव करताना कोर्टाच्या भूमिकेबाबत म्हटले होते की, कोर्ट व त्यांचे न्यायाधिश या निर्णयाचा उद्देश समजू शकले नाहीत. 
 
दोन राज्यांनी दाखल केली होती याचिका- 
 
- वॉशिंग्टन आणि मिनेसोटा राज्यांनी ट्रम्प यांनी ट्रॅव्हल बॅन निर्णयाविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. तसेच हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. 
- दोन्ही राज्यांनी दावा केला होता की, या बंदीमुळे राज्यात राहण-या लोकांवर, विद्यापीठावर आणि उत्पनानावर त्याचा विपरीत परिणाम होईल.
- एवढेच नव्हे तर, न्यूयॉर्क-कॅलिफोर्नियासह इतर 18 राज्यांनीही ट्रम्प यांच्या या वादग्रस्त निर्णयाला विरोध केला होता. 
- त्यानंतर काही राज्ये कोर्टात गेली व कोर्टाने राज्यांची बाजू उचलून धरत ट्रम्प यांच्या धोरणामुळे मुस्लिम लोकांना लक्ष्य केल्याचा संदेश जाईल असे सांगत खडसावले होते.
- अखेर ट्रम्प यांनी या प्रकरणात माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. तसेच मुस्लिम नागरिकांवर बंदी घालण्याऐवजी देशातील सुरक्षा व्यवस्था व यंत्रणा अधिक कार्यक्रम करण्यावर भर देणार असल्याचे म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...