आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ संशयाच्या आधारावर स्थलांतरितांना अटक होणार, ट्रम्पंच्या धोरणाचा 3 लाख भारतीयांना फटका शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितासंबंधीच्या नवीन नियमानुसार केवळ संशयावरुन स्थलांतरितांना अटक केली जाणार आहे. त्याचा फटका ३ लाख भारतीय-अमेरिकींना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेत स्थलांतरितांची एकूण संख्या एक काेटी १० लाखांच्या घरात अाहे.
ट्रम्प यांच्या नव्या नियमांमुळे अंमलबजावणी करणारी यंत्रणा अधिक सबळ होणार आहे.
 
स्थलांतरित नियमांचा भंग केल्याच्या नुसत्या संशयावरून देखील कोणावरही कारवाई करण्याचे अधिकार त्यामुळे मिळणार आहेत. गृहमंत्री जॉन केली यांनी मार्गदर्शक तत्त्वासंबंधी दस्तावेजांवर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या आदेशानंतर मार्गदर्शक तत्त्वे जारी झाले.
 
  बेकायदा स्थलांतरितांच्या विरोधातील  ट्रम्प  यांच्या धोरणाला बळकटी देणारे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार कोणताही समुदाय किंवा व्यक्तीच्या विरोधात  बेधडक कारवाई करण्याची मुभा नव्या नियमामुळे अधिकाऱ्यांना मिळणार आहे. 
 
बेकायदा स्थलांतरितांवर ही कारवाई अपेक्षित आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु पुरेशा कागदपत्राचा अभाव असलेल्या भारतीय-अमेरिकी नागरिकांची संख्या ३ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे त्यांच्यावर संकट आेढावले असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. अशा प्रकरणांत दोन वर्षांपासून न्यायालयासमोर हजर न झालेल्यांवर कारवाई होणार आहे. 

त्यांना तत्काळ अमेरिका सोडून मायदेशी परतावे लागणार आहे. कोर्टाने फटकारल्यानंतर नियमाचा असा आधार घेण्यात आला, अशी टीका विरोधी गटाने सत्ताधाऱ्यांवर केली आहे. 
 
प्रशासनावर दबाव
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेऊन आता शंभर दिवस उलटले आहेत. सातत्याने धक्कादायक निर्णय जाहीर करण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली. त्यात इमिग्रेशनचा निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला. कोर्टाने त्याला स्थगिती दिल्यानंतरही ट्रम्प गप्प राहिलेले नाहीत.
 
हेच स्थलांतरितांसाठी काढण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वावरून दिसून येते. त्याचे स्वरूप प्रशासकीय असले तरी सामान्य नागरिकांच्या रोषाचा प्रत्यक्षपणे प्रशासनाला सामना करावा लागणार आहे.  ट्रम्प प्रशासनावर त्यामुळे दबाव निर्माण होऊ शकतो.
 
तरुण, नोकरदारांना सूट
बेकायदा अमेरिकेत राहणाऱ्या तरुण किंवा नोकरी करणाऱ्या विशिष्ट वर्गाला मात्र ट्रम्प यांच्या नव्या आदेशातून वगळण्यात आले आहे. ही संख्या ७ लाख ५० हजारांवर आहे. त्यांच्याकडे वैध कागदपत्रे नसली तरी त्यांना अमेरिकेत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपली शाळा, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता येणार आहे, असा दावा करण्यात आला. 
 
स्थलांतरितांनी केली गर्दी
ट्रम्प यांच्या अवैध स्थलांतरितांच्या विरोधातील कडक कारवाईच्या धास्तीने  शेकडो नागरिकांनी इमिग्रेशन कार्यालयासमोर नवीन अर्जासह गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. वैध नागरिकांना फटका बसणार नाही. 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...