आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमे खोटारडीच, माझेच नव्हे तर सर्व अमेरिकन्सचे शत्रू, ट्रम्प यांचा हल्लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प आपल्या मुलांसमवेत... - Divya Marathi
डोनाल्ड ट्रम्प आपल्या मुलांसमवेत...
वॉशिंग्टन- डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मीडियावर हल्लाबोल केला आहे. देशातील मीडिया सर्व अमेरिकन लोकांचा शत्रू असल्याचे त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये बोलावलेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये त्यांनी मीडिया अप्रामाणिक व खोटारडा असल्याचे सांगितले. आपल्याला माहीत असेलच की, ट्रम्प यांनी यापूर्वीही माध्यमांना फटकारत आरोपींच्या पिंज-यात उभे केले होते.
 
ट्वीट डिलीट करून आणखी दोन नावे टाकली....
- ट्रम्प यांनी फ्लोरिडात आपल्या हॉलिडे होम मार-अ-लागो येथे लँड केल्यानंतर टि्वट करत मीडियावर हल्लाबोल केला.
- हा सलग तिसरा आठवडा आहे जेथे ट्रम्प मार-अ-लागोत विकेंड घालवायला पोहचले आहेत.
- ट्रम्प यांनी आपल्या ट्वीटमध्ये, "द फेक न्यूज मीडिया (न्यूयॉर्क टाइम्स, एनबीसी, एबीसी, सीबीएस आणि सीएनएन) माझेच नव्हे तर अमेरिकन लोकांचे शत्रू आहेत."
- ट्रम्प यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, यात न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, एनबीसी आणि अन्य काही नावे होती. त्याच्याशेवटी SICK! असे लिहले होते.
- नंतर त्यांनी हे टि्वट डिलीट केले आणि आपल्या ब्लॅक लिस्ट मध्ये आणखी दोन शत्रूंची नावे अॅड केली. 
 
तुम्ही फक्त वाईट गोष्टी, बाबी दाखवता- 
 
- शुक्रवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाउसमध्ये प्रेस कॉन्फ्रेंस बोलावली तसेच माध्यमांना काही चांगले-वाईट ऐकवले.
- ट्रम्प यांनी सांगितले की, "मीडिया आमच्या प्रशासनावर हल्ला करत आहे. कारण आम्ही जी शपथ घेतली त्यानुसार काम करत आहोत. त्यामुळे ती नाराज आहेत."
- "मी जेव्हा जेव्हा टीव्ही ऑन करतो किंवा वृत्तपत्र उघडून पाहतो तेव्हा त्यात केवळ वाईट, चुकीच्या गोष्टी दिसतात." 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...