आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प मूर्ख, हिलरी कमजाेर; चर्चेत झाले अाराेप-प्रत्याराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फार्मविले (अमेरिका) - अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांत मंगळवारी रात्री चर्चा चांगलीच रंगली होती. डोनाल्ड ट्रम्प हे मूर्ख आहेत, असे म्हणणाऱ्या डेमोक्रॅटिकचे टीम केन यांच्यावर रिपब्लिकनचे उमेदवार माइक पेन्स यांनी हिलरी परराष्ट्र धोरणात कमकुवत आहेत, असा आरोप केला. चर्चेत पेन्स यांनी सरशी मिळवली.

चर्चेच्या सुरुवातीलाच केन (५८) यांनी पेन्स (५७) यांच्यावर घणाघात केला. ट्रम्प यांना हुकूमशहा आवडतात. ब्लादिमीर पुतीन, किम जाँग उन, मुअम्मर गद्दाफी, सद्दाम हुसेन यांच्याकडे सकारात्मकदृष्ट्या पाहिले पाहिजे, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते, असा हवाला केन यांनी दिला. त्यावर पेन्स म्हणाले, त्यांच्या म्हणण्यात गैर काहीच नाही. ब्लादिमीर पुतीन अत्यंत कणखर व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यासारख्या नेत्यामुळे देशाची वाटचाल चांगल्या प्रकारे होऊ शकते. अन्यथा बराक आेबामा व हिलरी क्लिंटन यांच्याप्रमाणे परराष्ट्र धोरणात आपल्यावर दुबळे राहण्याची वेळ येते, असा टोला त्यांनी लगावला.

उपराष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांत बऱाच वेळ वाद रंगला होता. त्यात व्यापाराचाही मुद्दा होता. परंतु केन यांच्या ट्रम्प यांच्याविषयीच्या काही वादग्रस्त प्रश्नावर मात्र पेन्स फारसे काही बोलू शकले नाहीत. स्वत: पेन ज्यांचे समर्थन करू शकत नाही, अशा व्यक्तीला मतदान करा, असे पेन्स यांचे आवाहन आहे, असा टोला केन यांनी मारला. रविवारी राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुसरी टीव्ही चर्चा होणार आहे.

पेन्स यांना मिळाला कौल
चर्चेत सातत्याने बचावात्मक बोलणारे पेन्स यांनीच सरशी घेतली. परंतु ट्रम्प यांच्याविषयी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक उत्तरे दिली होती. त्यांना टीव्हीवरून ४८ टक्के, तर केन यांना ४२ टक्के असा जनमताचा कौल मिळाला. टीव्ही प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीवरून चर्चेतील जय-पराजय ठरवण्यात येतो.

दोन्ही नेते मुरब्बी
केन व पेन्स हे दोन्ही नेते अमेरिकेच्या राजकारणातील मुरब्बी मानले जातात. केन हे व्हर्जिनियातून सिनेटर आहेत. पेन्स इंडियानाचे गव्हर्नर आहेत. दोघांत ९० मिनिटांची चर्चा झाली. चर्चेतील दोन्ही नेत्यांच्या बोलण्याचा तपशील देण्यात आला आहे. त्यात एकूण चर्चेत ६० टक्के पेन्स, तर ४० टक्के केन बोलले. चर्चेसाठी पेन्स यांना ट्विटरवरून २२ हजार व केन यांना १५ हजार फॉलोअर मिळाले.
बातम्या आणखी आहेत...