आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trump Clinton Score Major Victories. Hillary Clinton Says Half Of Cabinet Would Be Women

अमेरिकेत उत्सुकता शिगेला; हिलरींना 2,141, ट्रम्प यांना 954 प्रतिनिधींचा पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिलाडेल्फिया- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध गटाला ईशान्य भागातील सुपर ट्युसडेमध्ये सपाटून पराभवाला सामोरे जावे लागले. ट्रम्प पाचही राज्यांत बहुमत मिळवण्यात यशस्वी ठरले, तर डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन पाचपैकी चार राज्यांत यशस्वी ठरल्या.

हिलरी क्लिंटन पाचपैकी चार राज्यांत यशस्वी ठरल्या. रोड आयर्लंडमध्ये त्यांना बर्नी सँडर्सकडून मात खावी लागली. तेथील प्रतिनिधींचे संख्याबळही कमी आहे. त्यामुळे हिलरींच्या आगेकूच करण्यात फारसे अडथळे नाहीत.

या यशानंतर कोणत्याही मोठ्या पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यास हिलरी क्लिंटन पात्र उमेदवार ठरल्या आहेत. त्यांच्याकडे आता २,१४१ प्रतिनिधींचे समर्थन आहे, तर सँडर्सकडे १,३२१ जणांचे समर्थन आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी २,३८२ प्रतिनिधींचे समर्थन आवश्यक आहे.

तर रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख दावेदार टॅड क्रूज आणि जॉन केसिक मिळून ट्रम्प यांना मात देण्याची तयारी करत होते. पाचपैकी चार राज्यांत केसिक दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांना केवळ पाच प्रतिनिधींचे समर्थन मिळाले. क्रूज चार राज्यांत अंतिम स्थानी होते. यासोबतच ट्रम्प यांच्याकडे ९५४ प्रतिनिधींचे समर्थन आहे. पार्टीच्या तिकिटासाठी १,२३७ प्रतिनिधींच्या समर्थनाची गरज आहे.

ट्रम्पविरोधी रणनीती :
आगामी निवडणुकीसाठी क्रूज आणि केसिकने ट्रम्पविरोधी रणनीती बनवली आहे. केसिक इंडियानात प्रचार करत नाहीत. क्रूज त्यानंतरच्या आेरेगॉन आणि न्यू मेक्सिकोत प्रचार करणार नाहीत.

हिलरींचा टिकाव लागणार नाही - ट्रम्प
हिलरींच्या टीकेला ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येण्याचे धाडस हिलरींकडे नाही. त्यांचे तितके सामर्थ्यही नाही. चीन, जपान, मेक्सिकोसारख्या देशांसमोर त्यांचा टिकाव लागणार नाही. विजयी झाल्यावर ते म्हणाले, ‘आता माझ्या सर्व चिंता दूर झाल्या. मला रोखणे आता शक्य नाही. मी राष्ट्राध्यक्ष झालो तर माझी धोरणे उदार नसतील. मी देशाचे प्रतिनिधित्व समर्थपणे करेन. मात्र, माझे व्यक्तित्व मी बदलणार नाही.