आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची साक्षीदार ठरणार हैदराबादची परिषद - ट्रम्प कन्या इव्हांका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या आणि अमेरिकेची फर्स्ट डॉटर इव्हांका ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहे. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत अमेरिका आणि भारताच्या मजबूत मैत्रिचे हैदराबादेतील समिट साक्षिदार ठरणार अशी प्रतिक्रिया दिली. इव्हांका ग्लोबल एंटरप्रिन्योर समिट (GES-2017) मध्ये सहभागी होणार आहे. 28 ते 30 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या समिटमध्ये इव्हांका अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहे. या समिटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच इव्हांका ट्रम्प देखील भाषण देणार आहे.

 

> वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारत दौऱ्यापूर्वी इव्हांका ट्रम्पने पत्रकार परिषद घेतली. यात इव्हांका म्हणाली, "हे समिट होण्याची ही आठवी वेळ आहे. प्रथमच या समिटची थीम 'वुमन फर्स्ट अॅन्ड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल' अशी ठेवली जात आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांविषयी आयोजकांचा दृष्टीकोन यातून सिद्ध होतो."
> समिटमध्ये 170 देशांचे 1500 एंटरप्रिन्योर सहभागी होत आहेत. त्यात अमेरिकतील 350 जणांचा समावेश आहे. त्यातही मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. 
> समिटमध्ये अमेरिकेचे कोषागार जोव्हिता कॅरांजा, ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन अॅन्ड रेग्युलेटरी अफेयर्सच्या नेओमी राव, US-AID (अमेरिका निधी) अॅडमिनिस्ट्रेटर मार्क ग्रीन आणि ओव्हरसीज प्रायव्हेट इन्वेस्टमेंट कॉरपोरेशनचे अध्यक्ष-सीईओ रे वॉशबर्न सहभाग घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...