आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाविषयी अमेरिका, ब्रिटन, जर्मनीत वाटाघाटी; ट्रम्प यांची थेरेसा आणि मर्केल यांच्याशी चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/ लंडन- सिरियामधील तणाव निवळण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेने ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मोर्केल यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
 
या दरम्यान उभय नेत्यांनी सिरिया प्रकरणात सुरू असलेला रशियाचा हस्तक्षेप आणि सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या भूमिकेवर मत मांडले. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच सिरियावर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहे. यात आतापर्यंत ८७ लोक मारले गेले. यात ३१ बालकांचाही समावेश आहे.
 
दरम्यान, अमेरिकेच्या या भूमिकेला मे आणि मोर्केल यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ब्रिटन सरकारचे प्रवक्ते म्हणाले की, ट्रम्प आणि मे यांच्यामध्ये सिरियातील शक्यतांबाबत गंभीर चर्चा झाली. सिरियातील राजकीय शक्यतांबाबत चर्चा करून त्यावर काही तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी रेक्स टिल्लरसन या आठवड्यात रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये जाणार आहेत. या वेळी ते मध्य पश्चिम भागातील सीमारेषा आणि इराणलगतच्या भागांतील स्थितीचाही आढावा घेतील.   

उत्तर कोरियाप्रकरणी चीनने दबाव आणावा
उत्तर कोरियाकडून वारंवार सुरू असलेल्या आण्विक परीक्षणाबाबत आणि धोक्याच्या इशाऱ्याबाबतही थेरेसा मे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा केली. चीनसारख्या बलाढ्य राष्ट्राने तसेच सर्व देशांच्या आंतरराष्ट्रीय समूहाने या प्रकरणी उत्तर कोरियावर दबाव बनवायला हवा, असा सूर दोघांच्या चर्चेत उमटला. दरम्यान, रासायनिक हल्ल्याची रशियाला आधीच माहिती असल्याचे वृत्त अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाकडून फेटाळून लावण्यात आले आहे.

टिल्लरसन यांनी बोलावली तातडीची बैठक
सिरियामधील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आणि त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी रेक्स टिल्लरसन यांनी जगातील प्रमुख देशांच्या उच्चायुक्तांची बैठक बोलावली. टिल्लरसन यासंदर्भात वाटाघाटीसाठी पुढच्याच आठवड्यात रशियाला जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...