आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायकः ट्रम्प यांच्या मेक्सिको दौऱ्यामुळे अमेरिकेमध्ये राजकीय भूकंप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिको / फिनिक्स- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक मेक्सिको दौरा केल्याने दोन्ही देशात राजकीय भूकंप आला आहे. त्यांच्या दृष्टिकोनात अचानक बदल झाला आहे. अमेरिकेत असताना मेक्सिकोचा विरोध, मेक्सिकोच्या लोकांना नशेखोर, तस्कर, रेपिस्ट म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी दौरा केला. मेक्सिकोत त्यांच्या दौऱ्यात त्यांना अनेक ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागले.

मेक्सिकोमधून परतल्यानंतर ट्रम्प यांनी अॅरिझोनाच्या फिनिक्समध्ये जाहीर सभा घेतली. ट्रम्प यांच्या जयघोष करणाऱ्या समर्थकांशी त्यांनी संवाद साधला. राष्ट्राध्यक्ष झाल्यास मेक्सिको अमेरिकेची सीमा सुरक्षित केली जाईल. बेकायदा प्रवेश करणाऱ्यांना रोखण्यात येईल. सीमेवर भिंत तयार केली जाईल. त्याचा सर्व खर्च मेक्सिकोला करावा लागणार आहे. खरे तर ट्रम्प काही तासांपूर्वीच मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना निएटो यांना भेटले होते. निएटो यांनी ट्रम्प यांच्या भाषणानंतर तत्काळ ट्विट केले. मेक्सिको एक पैसाही देणार नाही, असे निएटो यांनी त्यात नमूद केले होते. त्यावर ट्रम्प यांनी सुरक्षा भिंतीच्या मुद्द्यावर तर मेक्सिको राष्ट्राध्यक्षांशी चर्चाही झाली नाही, असा दावा केला.

क्लिंटनयांची आघाडी : डेमॉक्रॅटीकपक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी प्रतिस्पर्धी रिपब्लीकन पक्षाचे प्रतिस्पर्धी ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली आहे. लोकप्रियतेत त्यांनी ट्रम्प यांना टक्क्याने पिछाडीवर टाकले आहे, अशी माहिती गुरूवारी जाहीर झाली. गार्नर ४१ टक्के तर ट्रम्फ ३९ टक्के लिबर्टऍरीयन गॅरी जॉन्सन यांना टक्के तर ग्रीन पार्टीचे जील स्टेनस यांना टक्के मते मिळाली आहे.

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष पेना यांच्याशी हस्तांदोलन करताना ट्रम्प.
पहिल्याच परकीय धोरणाविषयीच्या मुत्सद्देगिरीच्या चाचणीत नापास रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकी अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (वय ७०) हेपहिल्याच परराष्ट्र धोरण चाचणीत नापास झाले अाहेत, टीका अध्यक्षीय पदाच्या शर्यतीतील स्पर्धक डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन (वय ६८) यांनी केली आहे. ट्रम्प हे नुकतेच मेक्सिको सिटीवरुन मेक्सिकोच्या अध्यक्षांना भेटुन परतले आहेत. त्यावरुनच हिलरींनी हे विधान केले आहे.

आधी चर्चा नंतर घूमजाव
मेक्सिकोमध्येराष्ट्राध्यक्ष पेना यांच्याशी त्यांनी बेकायदा स्थलांतरितांना प्रतिबंध, सीमा सुरक्षा, अंमली पदार्थ, शस्त्र तस्करी रोखणे, नॉर्थ अमेरिका फ्रीड ट्रेड अॅग्रिमेंटमध्ये (नाफ्टा) दुरुस्ती यावर चर्चा केली. परंतु मायदेशी परतताच त्यांनी चर्चा झालीच नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...