आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प यांचा प्रचारातील आश्वासनांपासून यू टर्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक आश्वासनांपासून यू टर्न घेतला आहे. मंगळवारी त्यांनी व्हिडिआे संदेशाद्वारे आपल्या प्राथमिकता सांगितल्या. बुधवारी त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की प्रचारादरम्यान त्यांनी जहाल वक्तव्ये केली होती. मात्र, पदभार स्वीकारल्यावर तसे निर्णय घेणार नाहीत. अनेक आश्वासंनापासून त्यांनी यू टर्न घेतला आहे. यात हिलरी क्लिंटन यांना तुरुंगात पाठवणे आणि हवामान बदलाच्या मुद्द्याचाही समावेश आहे. हवामान बदल हा चीनने उभारलेला बागूलबुवा असल्याचे ते म्हणाले होते.
आपण क्लिंटन दांपत्याचे नुकसान करू इच्छित नाही. हिलरींनी अनेक दु:खे सोसली आहेत. राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलो तर आपण हिलरींची रवानगी तुरुंगात करू व त्यासाठी विशेष वकिलाची नियुक्ती करणार असल्याचे ते प्रचारादरम्यान बोलले होते. हवामान बदलांविषयी ते म्हणाले की, मी यावर सखोल विचार करत आहे. आंतरराष्ट्रीय हवामान बदल करारातून बाहेर पडण्याचा पुनरुच्चार करणे त्यांनी टाळले. ते म्हणाले की स्वच्छ ऊर्जा, स्वच्छ पाणी विषयावर मी पूर्वग्रहविरहित काम करेन. आपल्याला स्वच्छ हवा व स्वच्छ पाणी हवे आहे.

याप्रमाणेच दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्याच्या संशयितांना आपण यातना देणार असल्याचे ते म्हणाले होते. आेबामांनी या गुन्हेगारांशी सक्तीने वागण्यावर निर्बंध आणले होते, त्यावरही ट्रम्प यांनी टीका केली होती. दरम्यान,ट्रम्प धर्मादाय संघटनेने जमा िधी कुटुंबासाठी खर्च केल्याची कबुली या ट्रस्टने बुधवारी दिली. फाउंडेशनला मिळालेली देणगी कुटुंबासाठी वापरल्याचे प्रकरण २०१५ मध्ये कर परताव्यासंदर्भात समोर आले होते.
जावयाला शांतिदूत पद
रिअल इस्टेट उद्योजक ट्रम्प यांनी आपले जावई जॅरेड कुशनर यांना मध्य-पूर्व देशांसाठी शांतिदूत नियुक्त करण्याचे संकेत दिले आहेत. जॅरेड यहुदी आहेत. इस्रायल-पॅलेस्टाइन वाद दीर्घकाळापासून सुरू असून तो सोडवण्याच्या दिशेने ते मदत करू शकतील, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. त्या क्षेत्राची जॅरेड यांना चांगली आेळख आहे. लोक त्यांना उद्योगापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच नव्हे, तर कन्या इवांकाची भेट घेण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...