आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेमध्ये येणाऱ्यांची होणार ‘टिटमस’ चाचणी - ट्रम्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील कट्टरवादाला रोखण्यासाठी रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन युक्ती लढवली आहे. नवीन नागरिकांच्या विचारसरणीची चाचणी व्हावी. त्यास ट्रम्प यांनी आयडॉलॉजिकल टेस्ट म्हटले आहे. लिटमस टेस्टच्या धर्तीवर ट्रम्प यांच्या चाचणीला मीडियाने ‘ट्रम्प आयडॉलॉजिकल टेस्ट फॉर मुस्लिम’ असे म्हटले आहे.

अमेरिकेच्या संस्कृती व मूल्यांचा आदर करणाऱ्या देशांना आपल्याकडे प्रवेश करण्याची परवानगी हवी. पूर्वी शीतयुद्धात नवीन स्थलांतरितांची विचारप्रणाली जाणून घेण्यासाठी विशिष्ट चाचणी घेतली जात होती. ती कठोरातील कठोर स्वरूपाची असली पाहिजे. आेहिआेतील एका प्रचार सभेत ट्रम्प बोलत होते.

देशासमोर अनेक प्रकारच्या समस्या आहेत. आपल्याला त्यात आणखी भर टाकायला नको. खरे तर अशा प्रकारच्या समस्या पूर्वी कधीच ऐकीवात नव्हत्या. त्याशिवाय दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आपल्या राज्यघटनेवर विश्वास नसलेले किंवा त्याचा तिरस्कार करून इतर कायद्याला महत्त्व देणाऱ्यांना देशात प्रवेशाची मुळीच परवानगी असता कामा नये. अमेरिकेत सहिष्णू भावनेने राहणाऱ्यांनाच व्हिसा दिला जायला हवा. सत्तेवर आल्यानंतर ही पद्धती आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पाकला सुनावले
पाकिस्तानात ऑनर किलिंगच्या घटनांत वाढ झाली आहे. देशात दरवर्षी १ हजाराहून अधिक मुलींची नातेवाइकांकडून हत्या केली जाते. निष्पाप महिला त्यांच्या नातेवाइकांच्या हातून बळी पडू लागल्या आहेत, अशा शब्दांत ट्रम्प यांनी पाकिस्तानातील कुप्रथेचा समाचार घेतला. आधुनिक विचारांचा पुरस्कार करणाऱ्या सर्व मुस्लिम राष्ट्रांशी संवाद साधण्याचे धोरण आम्ही ठेवणार आहोत. पाकिस्तानलाही या संवेदनशील मुद्द्यावर समजावून सांगितले जाईल, असे ट्रम्प म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...