आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प म्हणाले, मुलाखत, फोटोशूटसाठी तयार झालो असतो तर ठरलाे असतो टाइम पर्सन ऑफ द इयर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ म्हणून आपली निवड जवळपास निश्चित आहे. परंतु त्यासाठी मुलाखत आणि फोटोशूट करावा लागेल, असा टाइम मासिकाकडून कॉल आला होता. पण ‘जवळपास निश्चित’ हे शब्द खटल्याने मीच त्यांना नकार दिला, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी टि्वटरवर म्हटले. या दाव्यानंतर तीनच तासांत मासिकाने ट्रम्प खोटे बोलत असल्याचे सांगितले. निकाल येण्याआधी यासंबंधी काहीच बोलले जात नसल्याचे स्पष्टीकरण टाइम मासिकाकडून देण्यात आले. ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यात ट्रम्प यांचाही समावेश आहे. याचा निकाल ६ डिसेंबरला घोषित केला जाईल. याआधीसुद्धा ट्रम्प यांनी टाइमच्या यादीवर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले. २०१२ मध्ये टाइमने त्यांना जगातील प्रमुख १०० सेलिब्रिटीमध्ये निवडले नव्हते. त्या वेळी त्यांनी मासिकावर ताशेरे ओढत ‘मला न निवडून मासिकाने त्यांची विश्वनीयता गमावली आहे’, असे म्हटले. 

 

त्यानंतर २०१४ मध्ये यादी घोषित केल्यानंतर ‘माझ्या मते मलाच पर्सन ऑफ द इयर निवडले पाहिजे’, असे मत त्यांनी मांडले होते. शेवटी २०१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांना पर्सन ऑफ द इयर म्हणून िनवडण्यात आले. 

 

मोदी प्रमुख १० मध्येही नाही

निकाल येण्याच्या १० दिवस पूर्वीपर्यंत टाइम पर्सन ऑफ द इयरच्या शर्यतीत सौदी अरबचे शाह मोहंमद बिन सलमान २१ टक्के मतांसह सर्वात पुढे होते. दुसऱ्या क्रमांकावरील मी टू मोहिमेला आतार्यंत ६ टक्के मते पडली आहेत. जगभरात महिलांच्या होणाऱ्या  लैंगिक छळाविरोधात मी टू मोहीम राबवली गेली. ५ टक्के मतांसह ट्रम्प तिसऱ्या क्रमांकावर आहेत. उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग सुद्धा या यादीत आहेत. मागील वर्षी मतांच्या टक्केवारीत सर्वात पुढे राहणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा प्रमुख १० व्यक्तीतही नाहीत. 

 

प्रमुख १० दावेदार
- मो.बिन सलमान २१%
- मी टू मोहीम ६%
- डोनाल्ड ट्रम्प ५%
- हिलरी क्लिंटन ४%
- व्लादिमीर पुतीन ४%
- टेलर स्विफ्ट ४%
- अँजेला मर्केल ३%
- किम जोंग उन २%
- पोप फ्रान्सिस २%
- सेरेना विल्यम्स २%

 

 

बातम्या आणखी आहेत...