आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प म्हणाले- इंडिया डुइंग ग्रेट, काँग्रेसचा आरोप- RSS प्रमाणे रिपब्लिकनचे विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प - Divya Marathi
डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन - अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारी शर्यतीतील सर्वात पुढे असणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच भारताबद्दल वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भारत आणि चीन यांची एकसारखी सुरुवात झाली. भारत चांगली प्रगती करत आहे, मात्र त्याबद्दल कोणी फारसे बोलत नाही.

ट्रम्प यांनी चीन, मॅक्सिको, जपानवर साधला निशाणा; भारताचे कौतूक
ट्रम्प यांनी आतापर्यंत त्यांच्या भाषणात चीन, मॅक्सिको आणि जपान सारख्या देशांना अनेकदा फटकारले आहे. मात्र भारताबाबत त्यांचे धोरण सॉफ्ट राहिले आहे. 'सीएनएन'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'इंडिया इज ग्रेट. भारत चांगली प्रगती करत आहे, मी पाहात आहे, की बरेच उद्योग भारतात शिफ्ट होत आहेत.' 2007 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देताना ट्रम्प बोलत होते. ते म्हणाले, 'मी जसे सांगितले होते, त्याकडे जरा तुम्ही नजर टाका. मी सांगितले होते तसेच परिणाम पुढील काळात दिसून आले. मग ते इराकबद्दल असेल, इराण किंवा चीन, भारत, जपान बद्दल मी बोललो असेल.'
काँग्रेस नेते काय म्हणाले
संदीप दीक्षित म्हणाले, 'भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे स्वंयसेवक ज्या पद्धतीने विचार करतात, त्याच पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प विचार करतात.'

विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्य केले होते.

अमेरिकेबद्दल काय म्हणाले
ट्रम्प म्हणाले, 'आपल्या देशाला पाहा. आपण एक शक्ती म्हणून ओळखले जात होतो. जग आपल्याकडे आदराने पाहात होते. आता आमची जगात थट्टा केली जाते.'
ते म्हणाले, 'लोक अचानक चीन, भारत आणि इतर देशांबद्दल बोलत आहेत. मग ते आर्थिक बाबतीत आहे. अमेरिका फार मागे पडली आहे. याचे दुःख होते.'

पुढील स्लाइडमध्ये,
>> का केले होते मुस्लिम विरोधी वक्तव्य
>> दिवाळखोर ते अब्जाधीश