आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय इकोनॉमीचा ग्रोथ रेट 8%, अमेरिकेचा का नाही, रॅलीमध्ये ट्रम्प यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - यूएस प्रेसिडेंशियल इलेक्शनमध्ये रिपब्लिकन कँडिडेट डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांनी बराक ओबामांच्या धोरणांवर टीका करत म्हटले की, भारत 8 टक्क्याच्या दराचे विकास करत आहे, तर मग अमेरिकेला ते का शक्य नाही.

तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेचा विकासदर 2.9%
- आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अमेरिकेचा विकासदर 2.9 टक्के असल्याचे समोर आले असून हे आकडे धक्कादायक आहेत.
- न्यू हॅम्पशायरच्या मँचेस्टरमध्ये रॅलीदरम्यान ट्रम्प यांनी या मुद्द्यावरून ओबामा सरकारवर जोरदार टीका केली.
- ट्रम्प यांच्या मते, ओबामा हे असे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांच्या कार्यकाळात अमेरिकेचा ग्रोथ रेट 3% चा आकडा पार करू शकला नाही. एवढा मोठा देश असूनही अमेरिकेचा विकास वेगाने होत नाही.

भारताची स्तुती..
- ट्रम्प म्हणाले, भारत एक मोठा देश आहे. त्यांचा विकास दर ८ टक्के आहे.
- त्यांनी लोकांना विचारले, तर भारत या दराने विकास करत असेल तर मग अमेरिका का नाही?
- चीनचा ग्रोथ रेटही 6 ते 7 दरम्यान आहे. जर भारत-चीनचा विकासदर वाढला असेल तर ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे, असेही ते म्हणआले.

हिंदु व भारताचा मोठा फॅन
- ट्रम्प म्हणाले, मी हिंदु आणि भारताचा मोठा फॅन आहे. जर अध्यक्ष बनलो तर भारतीय आणि हिंदु समाजाचे व्हाइट हाऊसशी जवळचे नाते असेल.
- भारतीय लोक आणि त्यांचा देश महान आहे. मी त्याठिकाणी 19 महिन्यांपूर्वी गेलो होतो. पण तेव्हापासून आतापर्यंत यात बराच बदल झालाय.
- दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी भारताकडून होणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक व्हायला हवे. रेडिकल इस्लामिक टेररिझमच्या विरोधात अमेरिकाही तसेच करत आहे. हिलरी यांनी मात्र एकदाही या शब्दाचा उच्चार केला नाही, याचे दुःख आहे.
- भारताने मुंबई हल्ला झेललाय. माझे मुंबईवर प्रेम आहे. मुंबई आणि संसदेवरील हल्ले भयावर होते. ते विसरता येणार नाहीत.

मोदींवरही स्तुतीसुमणे..
- ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करताना म्हटले की, इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि ब्युरोक्रॅसीमध्ये सुधारणा करून त्यांनी वेगाने भारताचा विकास घडवून आणला. अमेरिकेतही असे होणे गरजेचे आहे.
- मी मोदींबरोबर मिळून काम करू इच्छितो. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे. त्यांना प्रशासनात सुधारणा घडवायची आहे. मला ते फार आवडतात.
- मोदी भारतात प्रो-ग्रोथ लीडर म्हणून समोर आले आहेत. त्यांनी करप्रक्रिया सोपी केली आहे. भारताचा वार्षिक विकास, 7% राहिला आहे. अमेरिकेलाही असा विकास करण्यासाठी मदत करावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...