आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ऑस्कर\'मध्ये पॉलिटिक्सची चर्चा, ट्रम्प म्हणाले- ती सायंकाळ ग्लॅमरस नव्हती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाचा ऑस्कर सोहळा फिका पडल्याचे ट्रम्प म्हणाले. - Divya Marathi
यंदाचा ऑस्कर सोहळा फिका पडल्याचे ट्रम्प म्हणाले.
लॉस एंजलिस - येथे झालेल्या ऑस्कर सोहळ्यात झालेल्या राजकीय चर्चेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले, 'ऑस्कर सोहळ्यात राजकारणावर चर्चा होत राहिली आणि आयोजक डोळेबंद करुन बसले होते. यामुळे सोहळ्याची चमक कमी झाली.'
 
'मला ही ग्लॅमरस सायंकाळ वाटली नाही' 
- ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या ओव्हल ऑफिसमध्ये 'ब्रीटबार्ट न्यूज' या वेबसाइटला मुलाखत दिली. 
- ते म्हणाले, 'माझी थोडी निराशा झाली. ऑस्कर सोहळ्याची चमक थोडी कमी झाली. तिथे राजकारवरच चर्चा होत राहिली आणि त्यावेळी आयोजक डोळे बंद करुन बसले होते. त्यामुळे मला ती सायंकाळ ग्लॅमरस वाटली नाही. असे वाटत राहिले की काहीतरी राहून गेले.'
- वास्तविक ट्रम्प यांनी हा सोहळ्या पाहिला की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
- ब्रीटबार्ट न्यूज वेबसाइट स्टीव्ह बॅनन हे चालवतात. बॅनन सध्या चीफ व्हाइट हाउस स्ट्रॅटजिस्ट आहेत.

गोंधळ : आधी ला ला लँडला उत्कृष्ट; मग म्हणाले, चुकलेच
उत्कृष्ट चित्रपटाच्या घोषणेसाठी अभिनेता वॉरेन बीटींनी लिफाफा उघडला. म्हणाले, बेस्ट फिल्मचा अवॉर्ड जातो ला ला लँडला... चित्रपटाची पूर्ण टीम आली. पुरस्कार दिल्यावर निर्माते डॉर्डन होरोविट्ज यांनी भाषण सुरू केलेही नाही तोच बीटी म्हणाले गडबड झाली. मग लिफाफा दाखवत होरोविट्ज म्हणाले ‘हा पुरस्कार मूनलाइटला...’ मला उत्कृष्ट अभिनेत्रीचा लिफाफा दिला होता, असे बीटी म्हणाले. अशीच चूक विश्वसुंदरी निवडीच्या वेळीही झाली होती. तेव्हा उद‌्घोषक हार्वेने चुकीची विजेती जाहीर केली होती.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...