आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान; मशीदी बंद पाडण्याचे आश्वासन देणाऱ्या उमेदवार सर्वात पुढे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2012 च्या निवडणुकीत ली पेन तिसऱ्या क्रमांकावर होत्या. - Divya Marathi
2012 च्या निवडणुकीत ली पेन तिसऱ्या क्रमांकावर होत्या.
पॅरिस - फ्रान्समध्ये रविवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान सुरू झाले. विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी यात उमेदवारी दाखल केलेली नाही. या निवडणुकीत देशभरातील मशीदी बंद पाडण्याचे आश्वासन देणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ली पेन जनमत चाचण्यांमध्ये सर्वात पुढे आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या उमेदवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही खंबीर पाठिंबा आहे. आपल्या देशात मुस्लिमांवर नवनवीन निर्बंध लादणारे ट्रम्प यांनी फ्रान्सच्या जनतेला ली पेन यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
 
काय म्हणाल्या ली पेन?
- राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नॅशनल फ्रंट पार्टीच्या कट्टर नेत्या मरीन ली पेन यांनी फ्रान्सच्या सर्वच मशीदी बंद पाडणार असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे, तर देशात तिरस्काराची भावना पसरवणाऱ्या सर्व मुस्लिम धर्मगुरूंना देशातून हकलून दिले जाईल आणि देशाच्या सीमा शर्णार्थींसाठी बंद केल्या जातील. 
- देशात कट्टरतावाद पसवणाऱ्यांवर देशाच्या सुरक्षा यंत्रणांची करडी नजर ठेवली जाणार आहे. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांना देशातून हकलून दिले जाईल. अशा व्यक्तींकडे फ्रान्सचे नागरिकत्व असेल तर, ते सुद्धा काढून घेतले जाईल. 
- ली पेन निवडून आल्यास त्या फ्रान्सच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. 2012 च्या निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. 
 
चोख सुरक्षा बंदोबस्त 
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानात अनर्थ टाळण्यासाठी 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पॅरिसच्या सर्वच मतदान केंद्रांवर अतीदक्षतेचा इशारा देण्यात आला. यावेळी फ्रान्समध्ये होणाऱ्या निवडणुकीत अमेरिकेचे आजी माजी राष्ट्राध्यक्ष सुद्धा अप्रत्यक्षरीत्या जोडले गेल्याने निवडणुकीत लोकांची उत्सुकता वाढली आहे. 
 
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, ओबामांनी कुणाला पाठिंबा दिला..?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...