आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनेथ जस्टर भारतातील US चे नवे राजदूत होणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इच्छेनुसार झाली निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
62 वर्षाचे केनेथ भारतीय घडामोडीचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांना केनेथ हे भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत असावेत असे वाटत आहे.  (फाईल फोटो) - Divya Marathi
62 वर्षाचे केनेथ भारतीय घडामोडीचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांना केनेथ हे भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत असावेत असे वाटत आहे. (फाईल फोटो)
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी केनेथ जस्टर यांना भारतात अमेरिकेचे राजदूत बनविण्याची इच्छा व्यक्त केली. केनेथ टॉप इकोनॉमिक अॅडवायजर आणि भारताविषयक घडामोडीतील तज्ञ आहेत. जून महिन्यात व्हाईट हाऊसने म्हटले होते की, 62 वर्षाचे केनेथ भारतात अमेरिकेचे नवे राजदूत असतील. अर्थ विषयाचे राष्ट्राध्यक्षांचे उपसहाय्यक आहेत केनेथ...
 
न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, केनेथ जस्टर आंतरराष्ट्रीय आर्थिक विषयाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे उपसहाय्यक आहेत तसेच नॅशनल इकोनॉमिक काउंसिलचे उपसंचालक आहेत. टॅम्प यांनी जस्टर यांना नॉमिनेट केल्यानंतर आता सिनेटने मंजूरी देताच ते रिचर्ड वर्मा यांची जागा घेतील. अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर 20 जानेवारीपासून ही पोस्ट खाली आहे. 
 
या पदांवर काम केलेय केनेथ यांनी-
 
- केनेथ जस्टर 2001 ते 2005 पर्यंत अंडर सेक्रेटरी ऑफ कॉमर्स होते. 
-1992-1993 या दरम्यान स्टेट डिपार्टमेंटमध्ये अॅक्टिंग कॉउन्सलर राहिले आहेत. 
- याशिवाय 1989 ते 1992 पर्यंत डिप्टी सेक्रेटरी ऑफ स्टेटमध्ये सीनियर अॅडवायजर सुद्धा राहिले आहेत.
 
या कंपन्यांशी संबंधित राहिलेत केनेथ-
 
- केनेथ इन्वेस्टमेंट फर्म Warburg Pincus LLC मध्ये पार्टनर, Salesforce.com मध्ये एग्जीक्यूटिव वाईस प्रेसिडेंट आणि लॉ फर्म Arnold एंड Porter मध्ये सीनियर पार्टनर राहिले आहेत. हॉर्वर्ड यूनिवर्सिटीत वेदरहेड सेंटर फॉर इंटरनेशनल अफेयर्सचे चेयरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. द आशिया फाउंडेशनचे वाईस चेयरमन राहिले आहेत. 
 
कायद्याची डिग्री सुदधा आहे जवळ- 
 
- केनेथ यांच्याजवळ हार्वर्ड लॉ स्कूलमधील कायद्याची पदवी आहे. याशिवाय हॉर्वर्डमधील जॉन एफ केनेडी गवर्नमेंट स्कूलमधून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर पदवी घेतली. हॉर्वर्ड कॉलेजमधील बॅचलर डिग्रीही आहे. 
बातम्या आणखी आहेत...