आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प इंडियानात विजयी, उमेदवारी निश्चित, क्रूझ यांनी सोडले मैदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियानामध्‍ये विजय मिळवल्यानंतर कन्य इवांका(डावीकडून) आणि पत्नी मेलानियासोबत(उजवीकडून)ट्रम्प. - Divya Marathi
इंडियानामध्‍ये विजय मिळवल्यानंतर कन्य इवांका(डावीकडून) आणि पत्नी मेलानियासोबत(उजवीकडून)ट्रम्प.
इंडियाना- डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियाना राज्यातील प्राथमिक निवडणुकीत आपले प्रतिस्पर्धी उमेदवार टेड क्रूझ यांचा पराभव केला. या विजयामुळे अमेरिकन अध्‍यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. ट्रम्प यांना काट्याची टक्कर देणारे रिपब्लिकन दावेदार टेड क्रूझ यांना मैदान सोडले. आता ट्रम्प यांना डेमोक्रेटिक पक्षाचे हिलरी क्लिंटन, बर्नी सँडर्सच रोखू शकता का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे इंडियानामध्‍ये सॅंडर्स यांनी क्लिंटन यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

इंडियानामध्‍ये ट्रम्प यांना मिळाले 50 टक्के मते...
- ट्रम्प यांना इंडियानाच्या निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली.
- अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प लवकरच विजेते म्हणून दिसतील असे भाकित करायला सुरुवात केले.
- वृत्तसंस्था एपीनुसार, क्रूझने आपले कॅम्पेन थांबवले. याबरोबरच ट्रम्प यांच्यासाठी पुढचा रस्ता सोपा झालायं.
- गेल्या एक महिन्यात प्राथमिक निवडणूक फे-यांच्या वेळी क्रूझ, ट्रम्प यांच्या पुढे जाऊ शकले नाही.
- आतापर्यंत ट्रम्प यांनी सात राज्यातील प्राथमिक निवडणूक फेरीत विजय मिळवला आहे. नामनिर्देशनसाठी 80 टक्के डेलिगेट्स मिळवले आहेत.
- दुसरीकडे डेमोक्रेट्स बर्नी सॅंडर्स आणि हिलरी क्लिंटन यांच्यामध्‍ये पुढे जाण्‍याची स्पर्धा सुरु आहे. क्लिंटन यांच्याकडे पक्षाचे 91 टक्के नॉमिनेशन आहे.
- जुलै महिन्यात अध्‍यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित होणार आहेत; 8 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत अध्‍यक्षीय निवडणूक होणार आहे.
पुढे वाचा... विजय मिळताच हिलरी यांना केले लक्ष्‍य, काही रिपब्लिकन्सचा ट्रम्प यांना विरोध, हिलरी यांनाही मोठ्या विजयाची गरज
बातम्या आणखी आहेत...