आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत अध्यक्ष ट्रम्प यांची 92 क्रमांकांनी घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती ३,९०० कोटींवरून २०,१५० कोटी झाली आहे. फोर्ब्जने श्रीमंत अमेरिकींच्या जाहीर केलेल्या यादीत ट्रम्प २४८ क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी ते १५६ व्या क्रमांकावर होते. त्या वेळी त्यांची एकूण संपत्ती २४,०५० कोटी रुपये होती.  

ट्रम्प यांच्या संपत्तीतील घसरणीमागे जगभरात रिअल इस्टेटमध्ये अालेली मंदी व मालमत्तांच्या किमती घटल्याचे कारण असल्याचे सांगितले जाते. राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ट्रम्प यांनी एकूण संपत्ती ६५,००० कोटी रुपये जाहीर केली होती. सप्टेंबर २०१५ मध्ये फोर्ब्जने त्यांची संपत्ती २९,२५० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. फोर्ब्जनुसार, गेल्या २ वर्षांत ट्रम्प यांच्या संपत्तीत ३१% घसरण आली आहे. ट्रम्प यांच्या अर्ध्या संपत्तीचा स्रोत न्यूयॉर्क सिटी रिअल इस्टेट आहे. गेल्या काही वर्षांत लक्झरी रिअल इस्टेटच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम ट्रम्प यांच्या संपत्तीवर झाला. मालमत्तांच्या किमती उतरल्यामुळे ट्रम्प टॉवरची किंमतही कमी झाली. याची मालकी ट्रम्प यांच्याकडे आहे. त्यांच्या सोन्यातील गुंतवणुकीचे मूल्यही कमी झाले. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात ४२९ कोटी खर्च केले होते. ट्रम्प युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या खटल्यात बाजू मांडण्यासाठी ट्रम्प यांना १६२ कोटी खर्च करावे लागले होते.  

फोर्ब्जच्या सीनियर वेल्थ एडिटर लुइसा क्रोल म्हणाल्या, ट्रम्प यांनी या वेळी क्रमवारी सुधारण्यासाठी विचारणा केली नाही. फोर्ब्जच्या ३६ व्या वार्षिक यादीत ४०० अब्जाधीशांची नावे असून त्यांची एकूण संपत्ती १७५ लाख कोटी रुपये आहे.

गेट्स सलग २४ व्या वेळी प्रथम, यादीत ५० महिलाही
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स २४ व्या वेळेस अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम राहिले. गेट्स यांची मालमत्ता ५.७८ लाख कोटी आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजो (५.२९ लाख कोटी) आहेत. संपत्ती वृद्धीच्या प्रकरणात फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. या यादीत २२ नवी नावे आहेत. यामध्ये नेटलिफ्टचे सहसंस्थापक व सीईओ रीड हॅस्टिंग्जचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या यादीत स्थान मिळवणारे २६ जण या वेळी बाहेर पडले. स्नॅपचॅटचे २७ वर्षीय इव्हान स्पीगल, ट्रम्प यांच्यासोबत २४८ व्या क्रमांकावर आहेत. ४०० अब्जाधीशांच्या यादीत ५० महिला आहेत.
बातम्या आणखी आहेत...