आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाखो अवैध मतांमुळेच हिलरींनी जिंकले ‘पॉप्युलर व्होट’ : ट्रम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठल्याही पुराव्याशिवाय अभूतपूर्व आरोप केला आहे. ते म्हणाले की, आठ नोव्हेंबरला लाखो लोकांनी अवैधपणे हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने मते दिली, त्यामुळे मी पॉप्युलर व्होट जिंकू शकलो नाही. एखाद्या नवनिर्वाचित अध्यक्षाने पहिल्यांदाच असा आरोप केला आहे. अवैध मतांमुळेच आपण व्हर्जिनिया, न्यू हॅम्पशायर आणि कॅलिफोर्निया या तीन राज्यांत हरलो. दुसरीकडे, ग्रीन पार्टीने विस्कोन्सिन, मिशिगन आणि पेनसिल्व्हेनिया या रस्ट बेल्टच्या तीन राज्यांत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यापैकी विस्कोन्सिनमध्ये फेरमतमोजणी सुरू झाली आहे.
डेमाेक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन पॉप्युलर व्होट्समध्ये रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा सुमारे २० लाख मतांनी पुढे राहिल्या. कॅलिफोर्नियासह काही राज्यांत अजूनही मतमोजणी सुरू असल्याने हा आकडा वाढू शकतो. पण या राज्यात हिलरी जिंकल्याने राज्याचे सर्व ५५ इलेक्टोरल व्होट्स हिलरींना देण्यात आली आहेत. तरीही एकूण इलेक्टोरल कॉलेज व्होटच्या हिशेबाने ट्रम्प यांनी मोठी आघाडी मिळवली आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘मी १५ राज्यांत प्रचार केला. जर मी फक्त तीन किंवा चार राज्यांतच प्रचार केला असता तर जास्त पॉप्युलर व्होट मिळाले असते.’

ट्रम्प यांनी जेथे आरोप केले तेथे ७२ मतांनी पराभूत
ट्रम्प यांनी व्हर्जिनिया, न्यू हॅम्पशायर आणि कॅलिफोर्नियात लाखो अवैध मतांचा आरोप लावला आहे. या राज्यांत इलेक्टोरल कॉलेजची एकूण ७२ मते होती. ही सर्व मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली. येथे फेरमतमोजणी किंवा फेरमतदान झाले तर ही राज्येही ट्रम्प यांच्याकडे येऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...