आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची दिवाळी; पंतप्रधान मोदींशी विशेष स्नेह असल्याचे म्हणाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच व्हाइट हाऊसच्या आेव्हल हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. यामध्ये कन्या इवांका, संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निकी हेली, अॅडमिनिस्ट्रेटर ऑफ सेंटर्स फॉर मेडिकेअरच्या सीमा वर्मा, यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष अजित पै यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षी निवडणुकांच्या वेळी ट्रम्प यांनी न्यू जर्सीमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायाच्या एका कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी केली होती. या वेळी ट्रम्प म्हणाले की, ‘दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. मी नागरिकांच्या सुख, शांतीसाठी प्रार्थना करतो.’ अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचे योगदान असामान्य असल्याचे ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपले खास नाते असल्याचे ट्रम्प म्हणाले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीदेखील आदल्या दिवशी येथील समुदायासह दिवाळी साजरी होती.  

दिवाळी साजरी करण्याची सुरुवात बुश यांनी केली होती
राष्ट्राध्यक्षपदी असताना जॉर्ज बुश यांनी अधिकृतरीत्या अमेरिकेत दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा व्हाइट हाऊसच्या इंडिया ट्रीटी रूममध्ये याचे आयोजन होत असे. जॉर्ज बुश मात्र यात कधीच सहभागी झाले नव्हते. आेबामांच्या कार्यकाळात पहिल्या वर्षी व्हाइट हाऊसमध्ये दिवा लावण्याची पद्धत सुरू झाली. 

फेसबुकवर ट्रम्प यांनी  लिहिले...  
आम्ही दिवाळी साजरी करून भारताच्या नागरिकांच्या योगदानाची दखल घेतली. भारतात हिंदुधर्मीय बहुतांश असून जगाला त्यांनी सर्वात मोठी लोकशाही दिली. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विशेष नाते आहे. आमच्या प्रशासनात भारतवंशीय अनेक अधिकारी आहेत. नेतेदेखील आहेत. भारतवंशीय अमेरिकनांनी विज्ञान, वैद्यक, व्यापार, शिक्षणात मोठे योगदान दिले. लष्करात तैनात भारतीयांच्या शौर्याची जाणीव मला आहे. जगभरात १ अब्जापेक्षा अधिक हिंदू आहेत. २० लाखांपेक्षा अधिक हिंदू अमेरिकेत आहेत.  
बातम्या आणखी आहेत...