आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्प यांचे आजोबाही अवैध मार्गाने आले अमेरिकेत, जर्मनीतून केले होते हद्दपार, इतिहासतज्ज्ञाचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आजोबा इ.स. १९०० मध्ये जर्मनीतून अवैध मार्गाने अमेरिकेत दाखल झाले होते. देश सोडण्यासाठी त्यांना आठ आठवड्यांची मुदत दिली गेली होती. एक दिवस ते जर्मनीतून पळून गेले, असा दावा एका जर्मन इतिहासकाराने केला आहे. यासाठी त्याने तत्कालीन स्थानिक काैन्सिलमधील रेकॉर्डही सादर केले. यावरून सिद्ध होते की डोनाल्ड ट्रम्प यांचे आजोबा फ्रेडरिक ट्रम्प अवैध मार्गाने अमेरिकेत दाखल झाले होते. ट्रम्पच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी अवैध मार्गाने अमेरिकेत येणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल, असे म्हटले होते. या नव्या माहितीमुळे या आश्वासनालाच मोठा धक्का बसला आहे.
फ्रेडरिक ट्रम्प यांचा जन्म जर्मनीतील बव्हेरिया राज्याच्या काल्सटॅट गावी झाला. जर्मन इतिहासकार रोलां पॉल यांनी १९०५ च्या स्थानिक कौन्सिलच्या पत्राचा आधार यासाठी घेतला. फ्रेडरिक यांनी सैन्यात अनिवार्य असलेली सेवा देण्याचे टाळले. त्यामुळेच त्यांना ८ आठवड्यांत जर्मनी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांविषयीची पत्रेही मिळाली आहेत.

मुलगी आजारी असल्याची सबब दाखवून जर्मनीत थांबण्याची मुदतही त्यांनी मागितली होती. शिवाय अनेक कारणे त्यांनी दाखवल्याचे पत्रांवरून दिसून आले. मात्र, दोन महिन्यांनंतर देश सोडण्याचे सक्तीचे आदेश दिले गेले.

एक दिवस फ्रेडरिक अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता चुपचाप देशातून निघून गेले. अवैध स्थलांतरित म्हणून ते अमेरिकेत दाखल झाले होते. तिथे त्यांनी रेस्टॉरंट्स व बोर्डिंग हाऊसचा उद्योग सुरू केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वडिलांचा जन्म अमेरिकेत झाला. तेथील स्कॉटलंडहून आलेल्या मेरी एन. मॅकलॉयडशी त्यांनी विवाह केला. डोनाल्ड त्यांचेच पुत्र आहेत.

ट्रम्प यांच्या जनसंपर्क विभागाकडून अद्याप यावर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, ट्रम्प यांचे आजोबा आणि आई अवैध मार्गाने अमेरिकेत आले होते, हे सिद्ध झाले आहे. यामुळे ट्रम्प यांच्या आश्वासनाला जोरदार झटका बसला आहे. आता अवैध मार्गाने आलेल्या नागरिकांविषयी ते काय भूमिका घेतात याकडे अमेरिकेतील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...