आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 मुस्लिम देशांना US मध्ये प्रवेश बंदी कायम, 23 दिवसांनंतर ट्रम्प यांची नवीन ऑर्डर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशनसंबंधीत नवीन ऑर्डर ड्राफ्ट तयार केला आहे. यामध्ये 7 मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदीचा उल्लेख करणात आला आहे. ज्या प्रवाशांजवळ अमेरिकेत येण्याचा व्हिसा अधीपासून आहे, अशा प्रवाशांना यामध्ये सवलत मिळणार आहे, या प्रवाशांनी व्हिसाचा वापर केलेला नसला तरी त्यांना सवलत मिळणार आहे. यापुर्वीही डोनाल्ट ट्रंम्प यांनी 27 जानेवारीला इमिग्रेशन बंदीसंबंधीत एग्झीकेटिव्ह ऑर्डर लागू केला होता.

फक्त 7 देशांना केले टारगेट...
- सुधारीत आदेशातही इराक, इरान, सीरिया, सोमालिया, सूडान, लीबिया आणि येमन या 7 मुस्लिम देशांना अमेरिकेमधे बंदी कायम ठेवण्यात येणार आहे.
- अधिकाऱ्यांच्या मते 'ग्रीन कार्ड होल्डर्स', अमेरिका किंवा अन्य देशातील दोन्हीकडचे नागरिकत्व असणाऱ्या नागरिकांना यामध्ये सवलत असणार आहे.
- याच आठवड्यात नवीन ऑर्डर लागू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 

काय म्हणाल्या व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या?
- सारा हकाबी सेंडर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन ऑर्डर ड्राफ्ट तयार आहे. याची एक फाइल लवकरच जाहीर करण्यात येइल. 
- वॉल स्ट्रीट जर्नलनुसार सुधारीत ऑर्डरमध्ये 7 मुस्लिम देशांवरच फोकस करण्यात आला आहे. ग्रीन कार्ड होल्डर्सना यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
- अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ऑर्डरमध्ये सामावेश असलेल्या देशांना त्यांच्या देशातील नागरिकांना बंदीविषयी माहिती देण्यासाठी 60 दिवसांचा अवधी देण्यात येईल.
 
7 मुस्लिम देशातील नागरिकांच्या इमिग्रेशनवर बंदी 
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 27 जानेवारीला 7 देशांच्या नागरिकांच्या इमिग्रेशनवर बंदी केली होती. त्यामध्ये इराक, ईरान, लीबिया, सूडान, सीरिया, सोमालिया आणि येमन या देशाचा सामावेश होता. 
- या 7 देशांची निवड करण्यामागे काही महत्वाचे कारणे आहे, असे व्हाइट हाउसचे चीफ ऑफ द स्टाफ रीस प्रीबस यांनी सागितले होते.
- काँग्रेस आणि ओबामा अॅडमिनिस्ट्रेशनी यांनी ओळखले होते की या  7 देशांमध्ये दहशतवादी प्रवृत्तींना मदत कण्यात येते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...