आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरींकडे ४.२ कोटी डॉलर, ट्रम्पकडे १३ लाखांचा निधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याच पक्षाकडून विरोध होत असलेले अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प हे आर्थिक संकटालाही तोंड देत आहेत. जूनच्या सुरुवातीला निवडणूक मोहिमेसाठी त्यांच्याकडे फक्त १३ लाख डॉलर (सुमारे ८.८० कोटी रुपये) होते. याउलट त्यांच्या डेमॉक्रॅटिक प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्या खात्यात ४.२ कोटी डॉलर (सुमारे २.८४ अब्ज रुपये) होते.

ट्रम्प आणि हिलरी या दोघांनीही अमेरिकेच्या निवडणूक आयोगाला ही माहिती दिली. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हिलरी अत्यंत हुशारीने निवडणूक मोहीम राबवत आहेत. हिलरी क्लिंटन यांच्याकडे सुपर पीएसी (राजकीय कृती समिती) फंडात आणखी ५.२ कोटी डॉलर (सुमारे ३.५२ अब्ज रुपये) आहेत.

अमेरिकेच्या गेल्या काही अध्यक्षपद निवडणुकीच्या तुलनेत ट्रम्प यांच्याकडील राहिलेली रक्कम सर्वात कमी आहे. ट्रम्प यांनी आपल्या वादग्रस्त निवडणूक मोहीम व्यवस्थापकाची हकालपट्टी केल्यानंतर ही माहिती बाहेर आली आहे. हिलरी आपल्या खर्चासाठी निधी गोळा करत आहेत.

ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; ब्रिटिश युवकावर गुन्हा
अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगासमधील रॅलीत एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक ओढून ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून १९ वर्षीय ब्रिटिश युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात नेवादा येथील फेडरल न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तीत म्हटले आहे की, डोनाल्ट ट्रम्प यांची शनिवारी मायस्टर थिएटरमध्ये रॅली झाली.
बातम्या आणखी आहेत...