आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trust On Science, No Buried Parents Believe Rebirth Son

विज्ञानावर विश्वास, दफनास नकार! आई-वडिलांना मृत मुलगी परत येईल असा विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - आई-वडील मुलांसाठी काहीही करू शकतात. निसर्गनियमांशीही झुंज देऊ शकतात. बँकॉकमधील सातोर्न आणि नरीरत यांनी याचा पडताळा दिला. त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलीला काळाने हिरावून नेले. माथेरिन तिचे नाव. वय अवघे दोन वर्षे. तिला मेंदूचा दुर्धर कर्करोग झाला होता.

पण आपल्या लाडक्या मुलीचा मृत्यू झाला, असे मानण्यास आई-वडील तयारच नव्हते. त्यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आता तिचे शरीर क्रायोनिक तंत्रज्ञानाद्वारे संरक्षित केले. वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा चमत्कार घडेल आणि ती पुन्हा जिवंत होईल, अशी आशा पेशाने वैद्यकीय अभियंता असलेल्या या माता-पित्यांना वाटतेय. या प्रक्रियेत मृताचे शरीर उणे १९६ अंश सेल्सियसमध्ये ठेवले जाते. शरीरातून रक्त आणि द्रवपदार्थ काढले जातात. जानेवारीत मृत्यूनंतर दोन तासांतच क्रायोनिक तंत्रज्ञानाद्वारे माथेरिनचे शरीर गोठवण्यात आले. अॅरिझोनाच्या अॅल्कर यांनी ही प्रक्रिया पार पाडली. पेशी खराब होऊ नयेत याची काळजी घेण्यात आली. नंतर तिला अॅरिझोनाला आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिचा मेंदू सुरक्षित ठेवला. क्रायोनिक तंत्रज्ञानाने शरीर सुरक्षित ठेवण्यात आलेली जगातील सर्वात लहान व्यक्ती अशी तिची नोंद झाली. तिचे आई-वडील लवकरच अॅरिझोनाला जाणार आहेत. तेथे त्यांच्या मुलीला सुरक्षित ठेवण्यात आले आहे. माथेरिनच्या स्मृतिप्रीत्यर्थ थायलंडमध्ये कर्करोगावरील संशोधनाला बळ मिळावे म्हणून दोघांनी मोठी देणगीही दिली आहे.