आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tunisia Bus Of Presidential Guards Targeted In Blast

ट्यूनिशियात सुरक्षा रक्षकांच्या बसवर हल्ला, 12 ठार, 30 दिवसांची आणीबाणी जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्यूनिस- आफ्रिकन देश ट्यूनीशियाची राजधानी ट्यूनिसमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणार्‍या बसमध्ये अज्ञात दहशतवाद्यांनी भीषण स्फोट घडवून आणला. स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 30 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

हल्ल्याची आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्विकारलेली नाही. मात्र, ISISच्या (इस्लामिक स्टेट) दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्राध्यक्ष बेजी एसेब्सी यांनी बुधवारचा स्वित्झर्लंडचा दौरा रद्द केला आहे. देशातील दहशतवाद उखडून फेकण्यासाठी बेजी एसेब्सी यांनी 30 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. जूननंतर हा सर्वात मोठा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. गेल्या जून महिन्यात ISIS च्या दहशतवाद्यांनी ट्यूनीशियाच्या सूस शहरात हल्ला केला होता. त्यात 38 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता.

हुकुमशाही संपुष्टात आल्यानंतर वाढले हल्ले...
ट्यूनीशियामध्ये दीर्घकाळापासून हुकुमशाही चालत होती. मात्र, ट्यूनीशियाचे हुकुमशाह समजले जाणारे अल अबीदीन बेन अली यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर देशाला ISIS ने आपले लक्ष्य केले आहे. ISIS ने 2011 नंतर ट्यूनीशियावर पहिला दहशतवादी हल्ला केला होता.