आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या हल्ल्यानंतर येथे पर्यटक फिरकलेच नाहीत, वर्षभरापासून रेस्तरॉं पडले उजाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ट्युनिशियाचे पर्यटन उद्योग पूर्णपणे ठप्प झाले होते. - Divya Marathi
गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ट्युनिशियाचे पर्यटन उद्योग पूर्णपणे ठप्प झाले होते.
ट्युनिस - ट्युनिशियाचे द रियू इंपीरियल मरहबा रेस्तरॉं सध्‍या उजाड पडले आहे. गेल्या वर्षी 26 जून रोजी इस्लामिक स्टेटच्या (आयएसआयएस) दहशतवाद्यांनी येथे सुट्ट्यांचा आनंद घेणा-या 38 लोकांना यमसदनी पाठवले होते. तेव्हापासून आतापर्यंत हे रेस्तरॉं रिकामे पडले आहे. येथे चुकूनही एकही पर्यटक आलेला नाही. या दहशतवादी घटनेनंतर ट्युनिशियाच्या पर्यटन उद्योगही ठप्प झाले. देशाच्या दुस-या हॉटेल्सवरही परिणाम...
ट्युनिशियाचे पर्यटन उद्योगही ठप्प
- या दहशतवादी कारवाईनंतर ट्युनिशियाच्या पर्यटन उद्योग जवळजवळ ठप्प झाले.
- या वर्षी केवळ 55 लाख पर्यटकांनी भेट दिली.
- हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्के कमी आहे.
- द रियू इंपीरियल मरहबा रेस्तरॉंवर हल्ल्याचा परिणाम दुस-या बीच व हॉटेल्सवरही झाला.
- पर्यटक न आल्याने अनेक लोकांनी आपले हॉटेल्स बंद ठेवले आहेत.
अर्धा तास गोळीबार करत होते दहशतवादी
- मृत्यूचा हा तांडव आयएसआयएसचा सैफुद्दीन रेजगुई याकूबीने अर्धा तास गोळीबार केला.
- तो दुपार होण्‍यापूर्वी एके-47 घेऊन येथील पोर्ट अल कांताऊईच्या या लोकप्रिय रेस्तरॉंवर पोहोचला.
- त्याने सनलाऊंजवर झोपलेल्या लोकांना उठवून रिकाम्या जगेत नेले व त्याच्यावर गोळीबार सुरु केली.
- दहशतवाद्याने ज्या लोकांना निवडले, त्यात अनेक म्हातारे होते.
- यानंतर तो इंपीरियलच्या दिशेने निघाला व लोकांना ओढत घेऊन गेला.
कोकीनच्या नशेत बुडाला होता दहशतवादी
- सैफुद्दीन कोकीनच्या नशेत बुडाला होता. तो पाठोपाठ गोळ्या व ग्रेनेड टाकत होता.
- या दुर्घटनेत जिवंत वाचलेल्या लोकांनी सांगितले, की दहशतवादी बिनधास्तपणे लोकांना मारत सुटला होता.
- जेव्हा तो हॉटेलच्या पाठीमागे पोहोचला तेव्हा एका पर्यटकाने त्याच्यावर हल्ला चढवला.
- यानंतर तो आणखी चिडला व त्याने पुन्हा अंदाधुंद गोळीबार सुरु केली.
- मात्र तोपर्यंत पोलिसांनी त्याला घेरुन गोळ्या झाडून त्याला मारले.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)