आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्युनिशिया: हास्य-विनोदात रंगले होते दहशतवादी, छत्रीतून केला गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊसे (ट्युनिशिया) - फ्रान्स, कुवैत आणि उत्तर अफ्रिकेच्या ट्युनिशियाच्या साऊसे शहरात शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्यांनी दहशतीची हकिकत सांगितली. साऊसे शहरात दहशतवाद्यांनी दोन हॉटेलांवर एकाचवेळी हल्ला केला. यात कमीत कमी 39 लोक मारले गेले. त्यात बहुतांशी ब्रिटन जर्मनीतील पर्यटकांचा समावेश आहे. इम्पेरियल मरहबा हॉटेलवर आयएसआयएसने केलेल्या हल्ल्यातून बचावलेली महिला पर्यटक ओलिव्हिया लिएथलेने सांगितले, 'ज्या दहशतवाद्यांनी हॉटेलवर हल्ला केला ते घटनेआधी सामान्य पर्यटकांप्रमाणेच वागत होते. एकमेकांशी हास्यविनोद करत होते. इतरही लोकांना जोक्स सांगत होते. मात्र अचानक त्याने छत्रीतून AK47 काढली आणि अंदाधूंद फायरिंग सुरु केली. तो निवडून निवडून ब्रिटन आणि फ्रान्सच्या नागरिकांना मारत होता. इतरांना त्याने तिथून जाण्यास सांगितले.'

तीन देशांमध्ये आयएसआयएसचा हल्ला
शुक्रवारी तीन देशांमध्ये सीरिया-इराकची दहशतवादी संघटना आयएसआयएसने हल्ले केले. यात आतापर्यंत 68 लोक मारले गेले आहेत. ट्यूनेशियाच्या साऊसे शहरातील दोन रिसॉर्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 39 लोक मारले गेल्याची माहिती आहे. येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधूंद फायरिंग केली. ब्रिटनसह अनेक देशांचे पर्यटक येथे थांबलेले होते.

मोबाइल चार्जिंग सुरु असल्याने प्राण वाचले
मॅनचेस्टरच्या चार्लटन येथील व्यवसायाने शेफ असलेल्या 24 वर्षांच्या ओलिव्हियाने सांगितले, की ती आणि तिचा बॉयफ्रेंड या हल्ल्यात बचावले. जेव्हा दहशतवदी गोळीबार करत होते, तेव्हा आम्ही मोबाइल चार्जिंगसाठी रुममध्ये होतो. आम्ही तिथेच लपून बसलो. नंतर एका महिलेने आम्हाला सांगितले, की दहशतवाद्यांनी तिच्या पतीवर गोळीबार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
बीचवर पर्यटकांप्रमाणे फिरत होते दहशतवादी
साऊसेच्या ज्या रिसॉर्टवर हल्ला झाला तेथील बीचवर इतर पर्यटकांप्रमाणेच दहशतवादी फिरत होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांनाच लक्ष्य केले. ओलिव्हियाने सांगितले, 'आम्ही थोड्या वेळातच बीचवर जाणार होतो. दरम्यान फायरिंगचा आवाज कानावर आला. तेव्हा कोणीतरी ओरडले पळा-पळा, लोक सैरावैरा धावत होते. फायरिंगचा आवाजही वाढला होता. तेव्हा मी फोनवर माझ्या वडिलांशी बोलत होते. फायरिंगचा आवाज ऐकल्यानंतर मी त्यांना म्हणाले, आय लव्ह यू पापा.. आय लव्ह यू. येथे हल्ला झाला आहे. माझे वडील आमच्यासाठी फोनवरच प्रार्थना करु लागले. '
इम्पेरियल मरहबा हॉटेलवर फायरिंग करणार्‍या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव सैफुद्दीन यकूबी असल्याचे कळते. 23 वर्षांचा हल्लेखोर विद्यार्थी आहे. त्याने AK47 ने अंदाधूंद फायरिंग केली त्यात पाच ब्रिटीश नागरिक ठार झाले.
मशिदीत स्फोट
कुवैतच्याएका शिया मशिदीत रमजानच्या नमाजादरम्यान शुक्रवारी एक आत्मघाती हल्ला करण्यात आला. यात 27 लोकांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर परिसरात रक्तमासांचा चिखल दिसत होता. अल सवाबेरमधील अल इमाम अल सादिक असे या मशिदीचे नाव आहे. ईस्लामिक स्टेटने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कुवैतमध्ये प्रथमच शिया मशिदीवर आयएसने हल्ला चढवला. २००६ नंतर आखाती देशातील हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इम्पेरियल मरहबा हॉटेल हल्ल्यातून बचावलेली ओलिव्हिया आणि घटनेशी संबंधीत छायाचित्रे