आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडनची भुयारी रेल्वेसेवा आता रात्रीही उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटिश नागरिकांच्या आवडीची सेवा असलेल्या भुयारी रेल्वे (अंडरग्राउंड रेल्वे) सेवा आता रात्रीदेखील उपलब्ध झाली आहे. ट्रान्सपोर्ट फॉर लंडननुसार पहिल्या दिवशी लंडनच्या मेयरसह ५० हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला. ऑक्स्फोर्ड सर्कस स्टेशनवर लोक या रेल्वेची आतूरतेने वाट बघत होते. व्हिक्टोरिया लाइनवर शनिवारी रात्री ही सेवा सुरू झाली. तेव्हा लंडनचे महापौर सादिक खान यांनीही या ट्यूब सेवेतून प्रवासाचा आनंद घेतला.
आपल्या कारकिर्दीला १०० दिवस पूर्ण होत असताना ही सेवा सुरू झाल्याने आपण खूप खुश आहोत, असे ते म्हणाले. रात्रकालीन ट्यूब सेवेची घोषणा नोव्हेंबर २०१३ मध्ये करण्यात आली होती. या सेवेला कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती. या रेल्वेत १०० पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते. वीकेंडच्यावेळी ट्यूब सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांनी वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...