आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turkey Arrests Isis New Year Suicide Bombing Suspects 22 Killed

इराक : आयएसच्या हल्ल्यात 22 ठार, आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला उडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिक्रित- इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी रविवारी इराकी लष्कराच्या प्रशिक्षण तळावर हल्ला चढवला. यामध्ये इराकी सुरक्षा दलाचे २२ जवान ठार, तर १५ जखमी झाले. हा हल्ला तिक्रितजवळ लष्करी तळावर झाला. गाडीवरून आलेल्या दोन आत्मघाती हल्लेखोरांनी पश्चिम द्वारावर स्फोट घडवला. यानंतर तीन हल्लेखोरांनी प्रशिक्षण घेणाऱ्या जवानांजवळ जाऊन स्वत:ला उडवले.

पोलिस प्रवक्त्यानुसार, अतिरेक्यांच्या निशाण्यावर निनेवे राज्यातून आलेले सुरक्षा जवान होते. इराकच्या उत्तर आणि पश्चिमेतील मोठ्या भूभागावर कब्जा केलेली अतिरेकी संघटना आयएसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रिजेक्शनिस्ट आर्मीचे प्रशिक्षक निशाण्यावर होते, असा संदेश त्यांनी जारी केला. सुन्नी अतिरेकी शिया मुस्लिमांना नकारात्मक म्हणून संबोधतात. कॅम्प स्पेशलमध्येच २०१४ च्या मध्यात सिरिया सीमेवर चालून येणाऱ्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात १,७०० जवानांची हत्या करण्यात आली होती.