आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turkey Shoots Down Russian Military Plane On Syria Border

सिरिया सीमेवर तुर्कीने रशियन लढाऊ विमान पाडल्याने प्रचंड तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा- सिरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी या लढाईत उतरलेल्या रशियाला मंगळवारी तुर्कीने डिवचले. रशियाचे एक लढाऊ विमान तुर्कीने सिरियाच्या सीमेवर पाडल्याने प्रचंड तणाव पसरला असून रशियानेही हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे म्हटले आहे. रशियन विमानाने आपली हवाई हद्द ओलांडल्याने आपण ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण तुर्कीने दिले आहे.
दरम्यान, रशियन विमानावर हल्ला होताच या विमानातील दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या साह्याने सुटका करून घेतल्याचे तुर्कीमधील माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, तुर्की सरकारने यातील एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे सांगत दुसरा बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. रशियाच्या या जेट विमानाचा हवेतच स्फोट झाल्याची छायाचित्रेही माध्यमांत प्रसिद्ध करण्यात आली असून सिरिया सीमेवर डोंगरामध्ये ते कोसळत असल्याचे छायाचित्रांत दिसत आहे.
परिसरात तणाव वाढण्याची भीती
सिरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेसह फ्रान्स, रशिया इत्यादी देशांनी कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान तुर्कीच्या आकाशात ही विमाने उडू लागली तर या भागात प्रचंड तणाव पसरू शकतो, अशी भीती सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती. आता रशियाचे विमान पाडण्यात आल्याने ही भीती अधिक वाढली असून राजनैतिक तणावही वाढला आहे.
तुर्कीच्या विनंतीवरून नाटोची बैठक
दरम्यान, रशियाचे विमान पाडल्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटो मित्रदेशांची एक तातडिची बैठक बोलावण्यात आली आहे. तुर्कीच्या विनंतीवरून ही बैठक बोलावण्यात आली असून परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे नाटोने म्हटले आहे.

बंडखोरांनी वैमानिकास मारले
तुर्कीने रशियन विमानावर हल्ला केल्यानंतर दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या साह्याने सुरक्षित बाहेर पडले. मात्र, सिरियाच्या या डोंगरात दडून बसलेल्या बंडखोरांनी केलेल्या गोळीबारात एक वैमानिक मारला गेला. दुसऱ्या वैमानिकाचा हे बंडखोर कसून शोध घेत असल्याचे बंडखोरांच्या एका नेत्याने नंतर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
विमान पाडणे अत्यंत गंभीर प्रकार
रशियाने आपले विमान पाडले गेल्याच्या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून याबद्दल रशियाकडे काहीच माहिती उपलब्ध नसताना तुर्की प्रशासनाने केलेल्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी याबद्दल अधिक बोलण्यास नकार दिला.
पाच मिनिटांत १० वेळा उल्लंघन
तुर्कीच्या लष्कराने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या या लढाऊ विमानाने केवळ पाच मिनिटांत दहा वेळा तुकीच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यानंतर दोन एफ-१६ जातीच्या विमानांनी रशियन विमान पाडले.
पाठीत खंजीर खुपसला...
आमचे विमान पाडून तुर्कीने रशियाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याचे तुर्कीशी असलेल्या संबंधांवर आगामी काळात गंभीर परिणाम होतील.
व्लादिमीर पुतीन, रशियाचे अध्यक्ष
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, विमान पडतानाचे फोटो..