आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turkey Shoots Down Russian Plane On Syria Border

रशियाचे विमान पाडण्यासाठी अमेरिकी क्षेपणास्त्राचा वापर केल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत/मॉस्को - रशियाचे लढाऊ विमान तुर्कीने पाडल्यावरून तणाव पसरला असताना हे विमान बंडखोरांनी अमेरिकेच्या क्षेपणास्त्रानेच पाडले होते, असा दावा अलेप्पोच्या दक्षिणेतील एका बंडखोर गटाने केला आहे. अमेरिकेची हे विमानभेदी क्षेपणास्त्र सौदी अरेबियामार्गे सीरियाच्या बंडखोरापर्यंत पोहोचली होती. याच बंडखोरांच्या मदतीने सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद विरोधकांशी लढा देत आहेत.

दरम्यान, बशर यांना पाठिंबा देत रशियाचे अध्यक्ष याच बंडखोरांविरुद्ध अभियान राबवत असल्याचा आरोप होत आहे. रशियन विमानाच्या वैमानिकाला आपल्या हद्दीतून माघारी जाण्यासाठी तब्बल १० वेळा इशारा दिला होता, असा दावा तुर्कीने केला आहे. याची ध्वनिफितही या देशाने जाहीर केली आहे. मात्र, या हल्ल्यात बचावलेला वैमानिक कॅप्टन मुरख्तीन यांनी आपल्याला कोणत्याच प्रकारचा इशारा देण्यात आला नव्हता, असा दावा केला. सहकारी वैमानिकाच्या मृत्यूचा बदला घेऊ, असा इशाराही मुरख्तीन यांनी दिला आहे.

दरम्यान, रशिया आणि तुर्की यांच्यातील तणाव वाढला असून अमेरिकेसह संयुक्त राष्ट्र आणि यूरोपीय संघांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तुर्कीकडून येत असलेले सामान रशियाने गुरुवारी आपल्या सीमेवरच अडवून टाकले. पूर्ण चौकशी केल्यानंतरच हे सामान रशियात आणले जाईल, असे रशियाच्या लष्कराने म्हटले आहे. दुसरीकडे, जॉर्जियाने आपल्या सीमेतून रशियात जात असलेले तुर्कीचे हजारो ट्रक अडवले आहेत. या ट्रकांवर तुर्कीची नंबरप्लेट असून त्यापैकी अनेक ट्रक अजरबैजान आणि तुर्कीला परत पाठवण्यात आल्याचे जॉर्जियाच्या वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी मनधरणी करण्याच्या उद्देशाने फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांदा गुरुवारी मॉस्को पोहोचले. तुर्कीसोबतचा वाद वाढवू नये तसेच पॅरिसमध्ये हल्ला घडवून आणणाऱ्या आयएस या अतिरेकी संघटनेवर हल्ला करण्याची विनंती ते रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना करतील. सीरियाचे राष्ट्रपती असद यांच्या विरोधकांवर सध्या रशियाचानि शाना आहे. दुसरीकडे, या विरोधकांना अमेरिकेकडून मदत सुरू आहे.
अनेकदा इशारे दिले : तुर्की अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
आमच्याकडून अनेकदा इशारा देऊनही रशियाच्या वैमानिकांनी त्यांच्या विमानाचा मार्ग बदलला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हल्ला करावा लागला, असे तुर्कीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, वैमानिकांना वाचवण्याचा आपण पुरेपुर प्रयत्न केल्याचेही तुर्कीचा दावा आहे. यासंदर्भात तुर्कीने एक ऑडिओ टेपही जारी केला आहे.
अमेरिका, युरोपीय संघावर होती रशियाची बंदी
रशियाने गेल्या वर्षी अमेरिका आणि यूरोपीय संघाचे सदस्य असलेल्या देशांतून खाद्यपदार्थांच्या आयातीवर बंदी घातली होती. युक्रेन प्रकरणात रशियावर या देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांनंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

रशियन हेलिकॉप्टरला अपघात, १५ ठार
मॉस्‍को - सैबेरिया भागात गुरुवारी एमआय-८ जातीचे एक हेलिकॉप्टर कोसळले. यात १५ लोक ठार तर १० जण जखमी झाले. हेलिकॉप्टरमध्ये २२ प्रवासी व चालक दलाचे तीन सदस्य होते. हे प्रवासी एका तेल कंपनीचे कर्मचारी होते.
- तुर्कीहून आयात होणारे साहित्य रशियाने सीमेवरच अडवले.
- जॉर्जियानेही आपल्या हद्दीत तुर्कीचे ट्रक अडवून ठेवले.