आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीच्या मंत्र्याला अटक करून डच पोलिसांनी सोडले जर्मनीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉटरडम/इस्तंबूल- तुर्कीचे अध्यक्ष तैयिर एर्दोगन यांची ताकद वाढवण्यासाठी १६ एप्रिलला होणाऱ्या सार्वमताबाबत तुर्की तसेच युरोपियन देशांत तणाव वाढत आहे. नेदरलँड्स पोलिसांनी तुर्कीच्या कुटुंब कल्याणमंत्री फातमा बेतुल सयान काया यांना शनिवारी रॉटरडॅममध्ये अटक केली आणि त्यांना जर्मनीत नेऊन सोडले. फातमा रॉटरडॅममध्ये सार्वमताच्या बाजूने सभा करण्यास गेल्या होत्या. त्याआधी रविवारी नेदरलँड्सने तुर्कीच्या परराष्ट्रमंत्री मेवलत कोवूसोग्लू यांचे विमान उतरवण्याची परवानगी दिली नव्हती.  

अप्रतिष्ठा करत हाकलून दिल्यामुळे भडकलेल्या फातमा रविवारी इस्तंबूलला पोहोचून म्हणाल्या की, नेदरलँड्समध्ये तुर्कीच्या लोकांना कठोर वागणूक दिली जात आहे. फातमांच्या स्वागतासाठी अतातुर्क विमानतळावर हजारो लोक उपस्थित होते. फातमा म्हणाल्या, ‘मुत्सद्दी पारपत्र असणारी मंत्री असल्याने मला कोणत्याही देशात तुर्क दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात आपल्या लोकांना भेटण्याचा अधिकार आहे कारण या इमारती तुर्कीच्या अधिकार क्षेत्रात येतात.’  

फातमा या नेदरलँड्सच्या रॉटरडम शहरात सभेला संबोधित करण्यासाठी आल्या होत्या. त्यांना रॉटरडॅममध्ये तुर्कीच्या वाणिज्य दूतावासाच्या इमारतीपासून ३० मीटर अलीकडेच ताब्यात घेण्यात आले होते. फातमा म्हणाल्या की, डच प्रशासनाने मला वाणिज्य दूतावासात प्रवेश करू दिला नाही तसेच वाणिज्य दूतावासातून कोणालाही बाहेर येऊ दिले नाही. हा अमानवी प्रकार आहे.
बातम्या आणखी आहेत...