आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turkish Airlines Plane Skids Off Nepal Runway, 227 Passengers Safe

नेपाळमध्ये लॅंड करताना रनवेवरुन घसरले तुर्कीचे विमान, 227 प्रवासी थोडक्यात बचावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- आज सकाळी काठमांडू विमानतळाच्या परिसरात दाट धुके होते. यावेळी तुर्कीचे विमान विमानतळावर उतरत होते. परंतु, वैमानिकाला रनवेचा अंदाज आला नाही. तो विमानाचे नियंत्रण गमावून बसला. सुदैवाने विमान रनवेच्या बाजूला असलेला मातीत रुतून बसले. या विमानातील सर्व 227 प्रवासी सुखरुप आहेत.
तुर्कीचे विमान एअरबस A330 ने इस्तांबुल विमानतळावरुन उड्डाण केले होते. त्यानंतर सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी विमान काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळ हवाई हद्दीत आले. विमानाने लॅंडिंगची परवानगी मागितली. यावेळी रनवेच्या परिसरात दाट धुके होते. विमान उतरवताना वैमानिकाला रनवेचा अंदाज आला नाही. त्यामुळे विमान रनवे सोडून बाजूला असलेल्या मातीत रुतून बसले. त्यानंतर इमरजन्सी गेटमधून प्रवाशांना विमानाच्या बाहेर काढण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून काठमांडूत जोरदार पाऊस सुरु आहे. शिवाय सकाळच्या सुमारास दाट धुक्यामुळे दृष्यताही कमी असते. अपघाताला हेच कारणीभुत असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाईडवर बघा, विमानतळावर नाकाच्या भागावर असे कोसळले विमान... बघा फोटो...